देश

Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली! उड्डाणपुलाजवळ सापडले मृत तरुणीच्या शरिराचे तुकडे

दिल्लीत गेल्या काही दिवसांत अत्यंत घृणास्पद अशा पद्धतीनं झालेले महिलांविरोधातील गुन्हे समोर आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली असून श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणं नवं हत्याकांड समोर आलं आहे. एका महिलेचा खून करुन तिच्या शरिराचे तुकडे शहराजवळील एका पुलाजवळ आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याचा तपासही सुरु करण्यात आला आहे. (Delhi shoked again the body parts of women were found near the flyover)

एएनआयच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना वर्दी मिळाली की बुधवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या शरिराचे तुकडे गीता कॉलनी फ्लायओव्हर भागात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या वर्दीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी चौकशी सुरु केली. (Latest Marathi News)

मुळची मुंबईची रहिवासी असलेली श्रद्धा वालकर (वय २७) हिची दिल्लीतील बॉयफ्रेन्ड अफताब पुनावाला यानं खून केला होता. तसेच तिच्या शरिराचे ३५ तुकडे करुन ते जंगलात टाकून दिले होते. ही घटना दिल्लीतच घडली होती. त्यामुळं पुन्हा एकदा या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT