Delhi crime News esakal
देश

Delhi crime : नराधमांनी फरफटत नेलेली तरुणी घरात एकटीच कमावणारी होती

सकाळ डिजिटल टीम

Delhi Crime News : जगभरात नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात येत होते. दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र संताप आणणारी घटना घडली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री अपघातानंतर एका वाहनाखाली अडकलेल्या तरुणीला 7-8 किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर त्या तरुणीचा मृतदेह विवस्र अवस्थेत सापडला आहे.

दिल्लीतल्या सुलतानपुरी भागात ही घटना घडली आहे. माहितीनुसार मृत तरुणीच्या वडिलांचं पूर्वीच निधन झालेलं आहे. घरामध्ये दोन बहिणी, दोन भाऊ आणि आई आहे. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. या घटनेत मृत झालेली २३ वर्षांची तरुणी कुटुंबात एकटी कमावणारी होती.

मृत मुलीच्या आईला किडनीचा आजार आहे. घरखर्च आणि इतर जबाबदाऱ्या मृत तरुणी पार पाडत होती. ती एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करायची. आता कुटुंबाचा आधार गेल्याने परिवार उघड्यावर आला आहे. हे कुटुंब दिल्लीतल्या अमन विहार भागामध्ये राहातं.

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक माहिती पोलिसांनी या प्रकरणाला अपघात असल्याचे म्हटले आहे. तपासात समोर आले की, अपघातानंतर मुलगी गाडीखाली फरपटत गेली, त्यामुळे तिचे कपडे फाटले.

कांझावाला येथील जोंटी गावाजवळ गाडीखाली मुलीचा मृतदेह अडकलेला पाहून रस्त्याने जाणाऱ्याने पोलिसांना फोन केला. एका खासगी समारंभात वेलकम गर्ल म्हणून काम करून ही मुलगी काल रात्री उशिरा घरी परतत असल्याची माहिती आहे. त्याच दरम्यान त्यांचा अपघात झाला. सध्या गाडी चालवणारा आरोपी अमितसह चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Viral Video : 'स्वतः कर्णधारपद सोडणार की PCB हकालपट्टी करणार?' पाकिस्तानी पत्रकाराचा थेट प्रश्न, सलमान अली आघा म्हणाला...

Mumbai News: घरेलू कामगारांचा सरकारला अल्टिमेटम, अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुदीची करावी; नेमक्या मागण्या काय?

T20 WC, SA vs ZIM: दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय... उपांत्य फेरीत न्यूझीलंडला भिडणार; दुसऱ्या Semi मध्ये इंग्लंड विरुद्ध....

SCROLL FOR NEXT