Delhi Fog 
देश

Dense Fog in north India: उत्तर भारतात शीतलहर, दिल्लीत दाट धुक्यामुळं रेल्वे, विमानसेवेवर परिणाम

हवामान खात्यानं या धुक्याबाबतचा अहवालही सादर केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उत्तर भारतात आज शीतलहर पसरली आहे. यामुळं अनेक भागांत सकाळी सात वाजेपर्यंत दाट धुकं पसरलं होतं त्यामुळं सर्वत्र अंधार पसरला होता. याचा परिणाम रस्ते वाहतूक तसेच रेल्वे आणि विमानसेवेवरही झाला. हवामान खात्यानं या धुक्याबाबतचा अहवालही सादर केला आहे. (Dense Fog cold wave in north India impact on railways air services)

हवामान खात्यानं काय म्हटलंय

हवामान खात्याच्या ट्विटनुसार, पहाटे साडेपाच वाजल्यापासून धुक्याची स्थिती पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक भागात अत्यंत दाट धुक्याची नोंद झाली आहे. तर पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सर्वसाधारण धुक्याची स्थिती होती. तर राजस्थान, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात कमी प्रमाणात धुकं दिसून आलं आहे. (Latest Marathi News)

विविध शहरांमध्ये अशी होती दृश्यमानता

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज सकाळी साडेपाच वाजता <_500 मीटर अशी नोंद झाली. तर पंजाबमधील पटियाळात -२००, अमृतसर - ५००, दिल्लीच्या पालममध्ये -२००, सफदरजंग - ५००; राजस्थानमधील गंगानगर, जयपूरमध्ये प्रत्येकी -५००; उत्तर प्रदेशातील बरेली, बहारिच, गोरखपूरमध्ये -२५, वाराणसी, लखनऊ, सुलतानपूर - ५० प्रत्येकी; बिहारमध्ये पूर्णिया - २५, पटना -२००, गया, भागलपूर - ५००, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर - २००, ओडिशातील जहारसिंगुडा, पुरी - ५०० तर आंध्र प्रदेशातील जिजावाडा - ५०० अशी धुक्याची स्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT