Voting  Sakal
देश

Voting : नागरिकत्व मिळून मतदानापासून वंचितच

आसाममधील सीमावर्ती भागातील अनेकांची समस्या

सकाळ डिजिटल टीम

सिल्चर ः आसाममधील सैदपूर येथील अंजली रॉय यांना भारतीय नागरिकत्व देणाऱ्या लवादाने २०१५मध्येच भारताचे नागरिकत्व देऊनही मतदार यादीमध्ये त्यांच्या नावापुढे ‘डी’(डाउटफूल) अर्थात संशयित असा २०१२मध्ये लागलेला शेरा अद्यापही पुसला न गेल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. अशीच परिस्थिती चैलटाकांडी या गावातील बानेसा बेगम यांची आणि अन्य हजारो जणांची आहे. बानेसा बेगम यांच्या सर्व कुटुंबीयांची नेवे राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत आहेत त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार आहे मात्र बानेसा यांच्या नावापुढे ‘डी’ असल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे.

बांगलादेशातून विस्थापित झालेला हिंदू बंगाली नागरिकांनी आसाममधील सिल्चर आणि करीमगंज या बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेला जिल्ह्यांत आश्रय घेतला आहे. दरम्यान या नागरिकांच्या नारिकत्वाविषयी आणि त्यांच्या नावापुढील ‘डी’ या शेऱ्याबाबत मागील कित्येक वर्षे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आश्‍वासने दिली असूनही यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

काय आहे ‘डी’ शेरा

आसामध्ये ९६ हजार ९८७ ‘डी’ शेरा असलेले नागरिक आहेत. ज्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत संदिग्धता आहे, अशा नागरिकांच्या मतदार यादीमधील नावापुढे ‘डी’ अर्थात डाऊटफूल असा शेरा १९९७मध्ये निवडणूक आयोगाकडून देण्यात आला असून त्यांना मतदानापासून रोखण्यात आले आहे. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी मतदानानंतर अवघ्या सहा महिन्यांत हा मुद्दा निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले आहे तर, काँग्रेसचे उमेदवार हाफीज अहमद रशिद चौधरी यांनी दावा केला आहे की, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सरकारला नसून निवडणूक आयोगाला असल्याने निवडणूक आयोगानेच याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT