देश

'शारदा चिटफंडामध्ये आसामचे उपमुख्यमंत्री'

श्‍यामल रॉय

कोलकाता : शारदा चिटफंड गैरव्यवहारात आसामचे उपमुख्यमंत्री हिमंत विश्‍व शर्मा यांच्यावर आरोप करून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नव्या संघर्षाला तोंड फोडले. भाजपचे आसनसोलचे खासदार बाबूल सुप्रियो यांच्यावरही त्यांनी आरोपांची तोफ डागली. 

शारदा समूहाकडून शर्मा यांनी सहा कोटी रुपये घेतल्याचा दावा ममता यांनी केला असून, सुप्रियो स्वतःला "द रोझ ऑफ द व्हॅली' म्हणवून घेत असल्याचेही त्या म्हणाल्या. कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या समर्थनार्थ गेले तीन दिवस सुरू केलेला सत्याग्रह मागे घेण्यापूर्वी समर्थकांपुढे बोलताना ममता यांनी हे आरोप केले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू या वेळी उपस्थित होते. 

आपल्या भाषणात ममतांनी पुन्हा "दिल्लीश्‍वरां'वर टीकास्त्र सोडले. शारदा गैरव्यवहारप्रकरणी शर्मा यांची आणि उघडपणे "आय ऍम द रोझ ऑफ द व्हॅली' म्हणणाऱ्या सुप्रियोंविरुद्ध सीबीआय चौकशी का होत नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी शारदा समूहाचे अध्यक्ष सुदीप्त सेन यांनी सीबीआयला पाठविलेल्या पत्राचा उल्लेख केला. हे पत्र सहा एप्रिल 2013 रोजी, म्हणजे सेन यांना अटक होण्यापूर्वी काही दिवस आधी सीबीआयला पाठविले होते.

हिमंत शर्मा यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचे सेन यांनी पत्रात म्हटल्याचे ममतांचे म्हणणे आहे. सेन यांचे सहकारी देवजानी यांच्याकडील "रेड डायरी'चाही त्यांनी उल्लेख केला. हिमंत यांच्या एका सहकाऱ्याला दिलेल्या पैशाचा या डायरीत उल्लेख असल्याचे त्या म्हणाल्या. 

डायरीबाबत सेन यांचे मौन 

खुद्द सेन यांनी या "रेड डायरी'बाबत मौन बाळगले आहे. त्यांना आज बारासत न्यायालयात आणण्यात आले होते. "रेड डायरी'बाबत पत्रकारांनी वारंवार विचारणा केल्यावर, कथित "रेड डायरी'ची मला कल्पना नाही; तुम्ही देवजानींनाच याबाबत विचारा, असे सेन म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT