Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sakal
देश

देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत ! नड्डा-शहांबरोबर खलबते

मंगेश वैशंपायन

महाराष्ट्रातील सत्तारूढ शिवसेनतील महा बंडखोरीनंतरच्या तप्त राजकीय वातावरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा दिल्ली गाठली.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तारूढ शिवसेनेतील महा बंडखोरीनंतरच्या तप्त राजकीय वातावरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा दिल्ली गाठली व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह ज्येष्ठ कायदेतजज्ञंबरोबर राज्यतील परिस्थितीबाबत चर्चा केली. २१ तारखेच्या मध्यरात्रीच्या बंडखोरींनंतर किमान चार वेळा कधी रात्री तर कधी पहाटे दिल्लीत येऊन गेलेले फडणवीस यांची आजची दिल्ली वारी ` माध्यमांना` व्यवस्थितपणे कळावी अशा रितीने आयोजित केेली गेली. यामुळे राज्यात सत्ता स्थापनेबाबतच्या ठोस हालचालींना भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने आता अंतिम नियोजनास सुरवात केल्याच स्पष्ट आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्टरात शिवसेनेच्या बंडखोरीनंतर भाजप सत्तास्थापनेसाठी पुढील पर्यायांवर ठळकपणे विचार करत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर 'अविश्वास प्रस्ताव' आणणे, विधानसभेचे अधिवेशन बोलावून सरकारचे अल्पमत सिध्द करण्याची व्यवस्थआ करणे व दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत बंडखोर आमदारांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचे सिध्द करणे. याच दरम्यान बंडखोर आमदारांनाही मुंबईत परत आणण्याची रूपरेषा भाजप नेतृत्वाच्या सल्ल्याने फडणवीस प्रत्यक्षात आणतील असे समजते.

फडणवीस आद दुपारी इंदिरा गांधी विमानतळावर उतरले. त्यांच्याबरोबर ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी हेदेखील होते. फडणवीस थेट शहांकडे जाणार असे कानोकानी सांगण्यात आल्याने माध्यम प्रतीनिधी शहांच्या निवासस्थानाजवळ धावले. प्रत्यक्षात फडणवीस तिकडे न जाता थेट मोतीलाल नेहरू मार्गावर नड्डांच्या निवासस्थानी गेले. तेथे उभयतांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. भाजपमधील संघप्रतीनिधीही यावेळी उपस्थित असल्याचे समजते. फडणवीस यांनी भाजप महासचिव अरूण सिह यांचीही भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास फडणवीस `पुढील सूचना` घेण्यासाठी अमित शहांच्या दरबारात पोहोचले.

शहा यांच्या निवासस्थआनातील कार्यालयात या संपूर्ण बंडखोरी नाट्यात बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे, फडणवीस, गुजरात व आसाम सरकारे आणि िद्ल्लीत स्वतः शहा यांच्यात समन्वयाची सूत्रे सांभाळणाऱया एका अधिकाऱयाशी त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी शहांबरोबर सुमारे ४० मिनीटे चर्चा केली. याच दरम्यान फडणवीस यांनी माजी साॅलिसीटर जनरल मुकूल रोहतगी व काही वरिष्ठ कायदेतज्ज्ञांबरोबर देखील चर्चा केली. त्यानंतर ते मुंबईत परतले. एकनाथ शिंदे हेही आज रात्री मुंबईत येूवून फडणवीस यांच्याशी चर्चा करून बंडखोर आमदारांच्या घरवापसीची रूपरेषा तयार करतील असे सांगितले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT