shivraj singh chauhan and Devendra Fadnavis sakal
देश

देवेंद्र फडणवीसांचा 'बिहार पॅटर्न', ‘टीम शिंदे' अशी ठरणार

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा भाजप सरकार आणण्याच्या स्वपप्नपूर्तीचा मार्ग मोकळा झाला.

मंगेश वैशंपायन

‘सत्ता मिलने के बाद बांटने जैसा बहोत कुछ होता है,‘ हे दिवंगत सुषमा स्वराज यांचे वचन भाजपमध्ये प्रसिध्द आहेच.

नवी दिल्ली - उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेत येणार आहे. आता शिंदे मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत चर्चा सुरू आहे. जाणकारांच्या मते भाजपने यापूर्वी मध्य प्रदेशातही पुन्हा सत्ता मिळवली त्यावेळी वापरलेला शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळ रचनेचा फॉर्म्यूला भाजप श्रेष्ठी महाराष्ट्रातही वापरू शकतात. आगामी २-३ दिवसांत याचेही चित्र स्पष्ट होईल. ‘सत्ता मिलने के बाद बांटने जैसा बहोत कुछ होता है,‘ हे दिवंगत सुषमा स्वराज यांचे वचन भाजपमध्ये प्रसिध्द आहेच.

हैदराबाद येथे २ व ३ जुलै रोजी होणाऱया भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचे माजी नव्हे तर विद्यमान मुख्यमंत्री म्हणूनच आपण सहभागी होणार, हे फडणवीस यांचे स्वप्न होते असे सांगितले जाते. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंचे नाव पुढे केले. फडणवीस मंगळवारी (ता. २८) दिल्लीत आले होते तेव्हा त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही मंत्रिमंडळ रचनेवर चर्चा केल्याची माहिती आहे.

टीम फडणवीसची रचना करताना भाजप नेतृत्वासमोर यंदाची मुंबई महापालिका निवडणूक व २०२४ ची लोकसभा, असे दुहेरी लक्ष्य असणार आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून हिसकावून घेण्यास भाजपसाठी सध्याचा काळ प्रचंड अनुकूल आहे

दरम्यान शिंदे मंत्रीमंडळाची रचना करताना भाजप ‘मध्य प्रदेश' च्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ पत्रकार सुजीत ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार ज्योतिरादित्य शिंदे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर पुन्हा शिवराजसिंह मंत्रिमंडळाची रचना करताना भाजपने बंडखोर गटाच्या ५ ते ६ आमदारांमागे एकाला मंत्रीपद हे सूत्र ठेवले होते. गृहखात्यासह भाजप स्वतःकडे २९ मंत्रीपदे ठेवण्याची शक्यता आहे. बंडखोर गटाचे ४८ आमदार धरले तर त्यांना किमान ८ मंत्रीपदे निश्चित मिळू शकतात. यातील दोन ते तीन कॅबीनेट व अन्य राज्यमंत्रीपदे असू शकतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांना मंत्रिपदे मिळाली नव्हती त्यांचा प्राधान्याने मंत्री करण्याकडे शिंदे यांचा कल असणार हे उघड आहे. महाराष्ट्रातील सरकार किमान अडीच वर्षे भक्कमपणे टिकावे यादृष्टीनेच भाजप हायकमांड फडणवीस मंत्रिमंडळाची रचना करेल.

२८८ सदस्यांच्या विधानसभेत बंडखोर शिवसेना गटासह भाजपकडे सध्या पूर्ण बहुमत दिसत आहे. भाजपचे १०६, अपक्ष १२, मनसेचा १ व शिंदे गटाचे किमान ३९ सदस्य धरता भाजप आघाडीचे संखयाबळ किमान १६१ वर जाते. बहुमताच्या शक्तीपरीक्षेत शिंदे गट गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा १२४ वर घसरेल ते भाजपसाठी आणखी फायदेशीर ठरेल.

लोकसभेतील अंकगणित

शिवसेनेचे संसदेतील (लोकसभा) १८ पैकी किमान १२ ते १३ खासदार शिंदे यांच्या ‘बाळासाहेब ठाकरे शिवसेना‘ या गटाबरोबर आजच असल्याचे सांगितले जाते. शिंदे यांचे पुत्र व लोकसभेतील अभ्यासू खासदार म्हणून ओळखले जाणारे डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही आगामी काळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाचे ‘योग' असल्याची चर्चा आहे. या शिंदेनिष्ठ गटाची आसनव्यवस्था वेगळी करावी लागेल काय, या दृष्टीने चाचपणीही सुरू झाल्याचे समजते. जर राज्य विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळाली तर सेनेचे संसदीय कार्यालय तर शिंदे गटाच्या ताब्यात येईलच, पण निवडक खासदार वगळता अन्य सेना खासदारही पहिल्या फटक्यात शिंदे गटाचा हात धरतील अशी चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

SCROLL FOR NEXT