DGCA imposes ₹1 crore penalty on Air India following regulatory compliance violations related to aviation safety norms.
esakal
DGCA imposes 1 crore fine on Air India : नागरी विमान वाहतूक महासंचानलाय(डीजीसीए)ने देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एअरलाइनने आवश्यक हवाई योग्यता परवान्याशिवाय आठ वेळा एअरबस विमान उडवल्याचा आरोप आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डीजीसीएने एका गोपनीय आदेशाच्या आधारे ही कारवाई केली. नियामकाचे म्हणणे आहे की अशा निष्काळजीपणामुळे विमान कंपन्यांवरील जनतेचा विश्वास आणखी कमी होतो. हे प्रकरण नोव्हेंबर २०२५ मध्ये घडली, जेव्हा आवश्यक प्रमाणपत्राची मुदत संपली असतानाही एअरबस A320 neo विमान प्रवाशांसह उड्डाण करत होते.
माहितीनुसार, एअरबस A320 neo विमानाने २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी दिल्ली, बंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद दरम्यान उड्डाण केले. यावेळी विमानाकडे एयरवर्थनेस रिव्यू सर्टिफिकेट (ARC) नव्हते.
एआरसी हे विमानाची सखोल तपासणी केल्यानंतर दरवर्षी जारी केले जाणारे अनिवार्य प्रमाणपत्र आहे. ते विमानाच्या देखभाल रेकॉर्ड, तांत्रिक स्थिती आणि सुरक्षा मानकांची तपासणी करते. हे मुख्य हवाई योग्यता प्रमाणपत्राची वैधता पडताळते. नियमांनुसार, एअर इंडियाला त्यांच्या विमानांसाठी एआरसी जारी करण्याचा अधिकार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.