DGCA taking regulatory action against IndiGo Airlines

 

esakal

देश

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

DGCA takes strict action against Indigo: इंडिगोने २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत पाच हजारांहून अधिक उड्डाणे रद्द केली होती. ज्याचा फटका देशभरातील लाखो प्रवाशांना बसला होता.

Mayur Ratnaparkhe

DGCA Imposes Heavy Penalty on IndiGo : मागील महिन्यात इंडिगो एअरलाइन्सने त्यांची हजारो उड्डाणे रद्द केली होती, ज्यामुळे लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. याप्रकरणी आता डीजीसीएने इंडिगो एअरलाईवर मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात आज(शनिवार) डीजीसीएने इंडिगोला २२.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

याआधी याप्रकरणी डिसेंबरमध्येच डीजीसीएने इंडिगोविरुद्ध मोठी कारवाई करत, त्यांच्या एकूण उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते.  तसेच DGCA ने इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स आणि सीओओ इसिड्रे पोरकेरास यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

 इंडिगोने २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत पाच हजारांहून अधिक उड्डाणे रद्द केली होती. एवढंच नाहीतर याव्यतिरिक्त, शेकडो इंडिगो उड्डाणे मोठ्या प्रमाणात विलंबाने चालवली गेली होती. ज्याचा फटका देशभरातील लाखो प्रवाशांना बसला होता आणि इंडिगो विरोधात प्रचंड संतापही व्यक्त झाला होता.

याप्रकरणी जारी केलेल्या निवेदनात, डीजीसीएने म्हटले आहे की इंडिगोविरुद्ध ही कारवाई एअरलाइनच्या ऑपरेशनल बिघाडांच्या आढाव्यानंतर करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय झाली. डीजीसीएने देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीला ६८ दिवसांसाठी दररोज तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, तसेच इंडिगोला १.८ कोटींचा वेगळा दंडही ठोठावला आहे. ज्यामुळे कंपनीला एकूण २२.२ कोटींचा दंड बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT