DCGA Action against Indigo eSakal
देश

Indigo Airlines Fined : इंडिगो एअरलाईन्सवर मोठी कारवाई; डीसीजीएने ठोठावला ३० लाखांचा दंड

गेल्या सहा महिन्यात टेल स्ट्राईकच्या चार घटना समोर आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Sudesh

डीसीजीएने इंडिगो एअरलाईन्सवर मोठी कारवाई केली आहे. यानुसार कंपनीवर ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच, डीसीजीएच्या निर्देशानुसार डॉक्युमेंट्समध्ये सुधार करण्याचे आणि ओईएम गाईडलाईन्स फॉलो करण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले आहेत.

गेल्या सहा महिन्यांमध्ये टेल स्ट्राईकच्या चार घटना समोर आल्यामुळे इंडिगो एअरलाईन्सवर ही कारवाई करण्यात आली. तसंच नागरी उड्डाण महासंचलनालयाने केलेल्या ऑडिटमध्ये कंपनीच्या ट्रेनिंग आणि इंजिनिअरिंग प्रक्रियेमध्ये त्रुटी असल्याचं समोर आलं. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

याआधीही मोठी कारवाई

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डीसीजीएने यापूर्वीही इंडिगोवर एक कारवाई केली होती. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद विमानतळावर लँडिंग करताना एक विमान जमीनीला धडकले होते. या घटनेनंतर डीसीजीएने एका कॅप्टनचं लायसन्स तीन महिन्यांसाठी, तर को- पायलटचं लायसन्स एका महिन्यासाठी रद्द केलं होतं. (Indigo Airlines)

या घटनेनंतर डीसीजीएने इंडिगोची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर चौकशीमध्ये अशा आणखी घटना घडल्याचं समोर आलं. जूनमध्ये लखनऊ-मुंबई, कोलकाता-दिल्ली या विमानांसोबतही असाच प्रकार झाला होता. तसंच, गेल्या सहा महिन्यात अशा चार घटना झाल्याचं डीसीजीएला दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT