डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (DGCA) देशातील विमानतळांवरील (Airports) कोविड प्रोटोकॉलबाबत (Covid Protocols) कडक पाऊल उचललं आहे. जर विमानतळांवर कोणी नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास संबंधितांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
देशातील काही विमानतळांवरील पाहणीत हे लक्षात आलंय की, कोविडच्या प्रोटोकॉल पाळण्याबाबत समाधानकारक स्थिती नाही. त्यामुळे सर्व विमानतळ ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत की, प्रवाशांनी विमानतळावर प्रवेश करताच कोविड-१९ चे प्रोटोकॉल पाळले जात आहेत की नाहीत याची पाहणी करावी. कोणत्याही व्यक्तीनं विमानतळावर व्यवस्थित नाक आणि तोंड झाकेल असा मास्क वापरला आहे का? त्याचबरोबर विमानतळाच्या परिसरात फिजिकल डिस्टंसिंगचं पालन केलंय का? त्याचबरोबर सर्व विमानतळ ऑपरेटर्सनी टेहळणीत वाढ करावी. त्याचबरोबर तात्काळ कारवाई करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात. यामध्ये कायद्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीनं स्पॉट फाईन (जागेवरच दंडात्मक कारवाई) करण्याबाबत विचार करावा, असं DGCAनं म्हटलं आहे.
"संजय राऊतसारख्या बडबड करणाऱ्यांना..."; काँग्रेस नेता आक्रमक
दरम्यान, १५ मार्च ते २३ मार्च या कालावधीत खासगी प्रवासी विमानांमध्ये १५ प्रवाशी कोविडचे नियमभंग करताना आढळले होते. या प्रवाशांवर तीन महिन्यांसाठी विमान प्रवासावर बंदी येऊ शकते, असं DGCAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होत. DGCAनं यापूर्वी म्हटलं होतं की, अनेकदा इशारा देऊनही एखाद्या प्रवाशाने व्यवस्थित मास्क लावलेला नसेल तर त्याला विमानातून खाली उतरवण्यात यावं तसेच त्याच्यावर नियमाप्रमाण कारवाई करण्यात यावी.
नव्या निर्बंधांमुळे मुंबईत आणखी ३० टक्के हॉटेल्स बंद होणार?
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये रोजच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या सर्व राज्यांमध्ये मिळून ७८.५६ टक्के नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, डोमेस्टिक फ्लाईट्सची संख्या सध्या पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, काही मार्ग वगळता आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.