Shirdi Saibaba  
देश

Shirdi Saibaba : " कोल्ह्याची कातडी धारण करून कोणी... " ; साईंबद्दल धीरेंद्र शास्त्री बरळले

Sandip Kapde

Shirdi Saibaba : धीरेंद्र शास्त्री महाराज पुन्हा बरळले आहेत. धीरेंद्र शास्त्री यांच्या कथित चमत्कार आणि विधानांमुळे त्यांची ओळख दिवसेंदिवस वाढत आहे. बाबा बागेश्वर पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांबाबत वक्तव्य केलं आहे. बाबा बागेश्वर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये धीरेंद्र शास्त्री साईबाबांना देव मानत नसल्याचे सांगत आहेत.

धीरेंद्र शास्त्री यांच्या एका भक्ताने त्यांना प्रश्न विचारला. डॉ. शैलेंद्र राजपूत नावाच्या व्यक्तीने निवेदक धीरेंद्र शास्त्रीला विचारले की, मला एक प्रश्न आहे की आपल्या देशात बरेच लोक साई भक्त आहेत. पण सनातन धर्म साईंची उपासना नाकारत असल्याचे दिसते. तर साईंची पूजा फक्त सनातन पद्धतीने केली जाते. त्यामुळे तुम्ही त्यावर प्रकाश टाका. आपल्या भक्ताच्या या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मी साईंना देव मानत नाही.

"सध्याच्या परिस्थितीनुसार तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपल्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्यांची आज्ञा पाळणे हा प्रत्येक सनातनीचा धर्म आहे. ते आपल्या धर्माचे प्रधान आहेत. कोणताही संत आपल्या धर्माचा असो कींवा दुसऱ्या धर्माचा असो तो संत असू शकतो, महापुरूष असू शकतो. पण देव नाही. साई बाबा संत होऊ शकतात, फकिर होऊ शकतात पण देव नाही होऊ शकत," असे वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. 

 कोल्ह्याची कातडी धारण करून कोणी सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असे देखील धीरेंद्र शास्त्री म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ex-servicemen: माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारकडून मोठी दिवाळी भेट मिळाली, कुटुंबियांनाही होणार लाभ

Ranji Trophy: ५ विकेट्स १८ धावांवर पडल्या, पण ऋतुराज गायकवाड लढला, शतकाची थोडक्यात हुलकावणी; महाराष्ट्राचे दमदार पुनरागमन

चाहत्याने चक्क फरशीवर घेतली वंदना गुप्तेंची स्वाक्षरी ! म्हणाल्या "मला गलबलून आलं.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात भर रस्त्यावर तिघा जणाकडून बांबूने एका तरुणाला बेदम मारहाण

Vaibhav Lakshmi Rajyog 2025: ५०० वर्षांनंतर तयार होतोय दुर्मिळ वैभव लक्ष्मी राजयोग! नरक चतुर्दशी दिवशी 'या' तीन राशींचं उजळणार भाग्य

SCROLL FOR NEXT