Digital Health Card  Team eSakal
देश

युनिक हेल्थ आयडी म्हणजे काय? कसे तयार कराल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन योजनेचा शुभारंभ झाला.

सुधीर काकडे

केंद्र सरकारने आज नागरिकांसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट, 2020 रोजी लाल किल्ल्यावरुन केली होती. त्यानुसार आयुष्मान भारत डिजिटल मिशनला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना डिजिटल हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. सध्या, सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम-डीएचएम प्रायोगिक टप्प्यात सुरु होणार आहे.

डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजे काय?

आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या या योजनेत वेगवेळे चार भाग आहेत. युनिक डिजिटल हेल्थ आयडी, प्रोफेशनल रजिस्ट्री, हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड. आरोग्य सेवेला डिजिटल रुप देण्याच्या हेतून ही योजना सुरु करण्यात आली आहे. डिजीटल युनिक हेल्थ आयडी हे एक ओळखपत्र असणार आहे. यामध्ये रुग्णाच्या वैद्यकीय उपचारांचे तपशील असणार आहेत. हे कार्ड आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकाच्या मदतीने बनवता येणार आहे.

हेल्थ कार्ड कसे बनवाल?

  1. आपल्याला जर हेल्थ कार्ड बनवायचे असेल ndhm.gov.in या संकेत स्थळावर जावं लागेल.

  2. त्यानंतर आपल्यासमोर यूनिक हेल्थ डिजिटल हेल्थ कार्ड बनवण्याचा पर्याय येईल. या पर्यायावर क्लीक करताच आपल्यासमोर हेल्थ कार्ड बनवण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

  3. सर्वात आधी आपल्याला आधार कार्डशी संबंधीत माहिती द्यावी लागणार आहे. त्यानुसार आपल्याला आपला आधार क्रमांक टाकावा लागेल.

  4. जर आपल्याला आधार कार्ड शिवाय हेल्थ कार्ड बनवायचे असेल, तर तसा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. त्यानुसार आपण आपल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन हे कार्ड बनवू शकतो. मोबाईल नंबर टाकताच त्यावर आपल्याला ओटीपी येईल.

  5. कार्ड बनवण्यासाठी आपल्याला आपला एक फोटो, आपली जन्म तारीख, पत्ता आणि आणखी काही माहिती द्यावी लागेल.

  6. त्यासाठी आपल्या समोर एक फॉर्म येईल, ज्यामध्ये ही सर्व माहिती द्यायची आहे.

  7. सर्व माहिती भरताच आपल्यासमोर आपले हल्थ कार्ड तयार होऊन येईल. ज्यामध्ये आपली सर्व माहिती, फोटो आणि क्यूआर कोड असेल. याच कार्डच्या माध्यमातून आपल्याला सर्व सुविधा मिळणार आहे.

डिजिटल हेल्थ कार्डचे फायदे काय?

युनिक डिजिटल हेल्थ कार्ड असलेल्या व्यक्तीला देशभरात कुठेही गेल्यास फक्त एक क्रमांक टाकून डॉक्टरांना त्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारांचे तपशील मिळणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना एका क्लीकवर आपल्याला यापूर्वी कोणता आजार होता आणि कोणते उपचार झाले हे समजणार आहे.

प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय उपचारांचे तपशील तपासण्यासाठी दवाखान्यांकडे या संकेत स्थळाचे अधिकार दिले जातील. या संकेत स्थळावर दवाखाना, क्लीनिक आणि डॉक्टरांची देखील नोंदणी असणार आहे. सुरुवातील सरकारने हे कार्ड अनिवार्य केले नसले तरी, मात्र हळू हळू सर्वांनाच या योजने अंतर्गत आपली नोंदणी करुन कार्ड तयार करावे लागणार आहे. यामुळे मेडिकल पेपर काढण्याची मेहनत वाचणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT