Digital Personal Data Protection Bill 2023 eSakal
देश

Data Protection Bill : डिजिटल डेटा संरक्षण कायदा लागू! विधेयकाला राष्ट्रपती मुर्मू यांची मंजूरी

लोकसभा आणि राज्यसभेने मंजूरी दिल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं होतं.

Sudesh

नवी दिल्ली : डिजिटल डेटा संरक्षण विधेयकाला राष्ट्रपती मुर्मू यांनी मंजूरी दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेने मंजूरी दिल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींनी आज सही करत त्याचं कायद्यात रूपांतरण केलं.

सोशल मीडियाच्या आधारे एखाद्या व्यक्तीची माहिती गोळा करणाऱ्या कंपन्यावर यामुळं कायद्याचं बंधन येणार आहे. सोबतच, ग्राहकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेण्यापूर्वी सोशल मीडिया कंपनीला ग्राहकांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. हा नियम तोडणाऱ्या कंपनीला 250 कोटींचा दंड करण्याची तरतूद या कायद्यात आहे.

या कायद्याने सरकारला एक डेटा प्रोटेक्शन बोर्ड तयार करण्याचा अधिकार मिळाला असून, या बोर्डाला सोशल मीडियावरील मजकूरासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दुसरीकडे, या कायद्याच्या निमित्ताने एक प्रकारे सोशल मीडियावर अंकुश मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. (Government Of India)

काय आहेत तरतुदी?

  • नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्यांसोबतच डेटा संरक्षण.

  • डेटाच्या गैरवापराला आळा घालणे.

  • व्यक्तिगत डेटाचा संग्रह आणि वापर वैध मार्गाने आणि सुरक्षितपणे व्हावा.

  • जाहीर उद्दिष्टांपुरताच डेटाचा वापर केला जावा.

  • गैरवापर झाल्यास वापरकर्त्या संस्थांवर जबाबदारी निश्चिती करणे.

  • नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणे.

  • डेटा प्रोटेक्शन बोर्ड स्थापन करणे.

  • उल्लंघनाची माहिती सुरक्षा बोर्डाला पारदर्शक पद्धतीने द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

Raigad Health: वीज नसताना मोबाईल टॉर्चच्या उजेडात यशस्वी प्रसूती; जांभूळपाडा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची धडाडी

Devshayani Ekadashi Celebration: देवशयनी एकादशीला मल्हार हिल विद्यालयात भक्तिरसाचा जल्लोष; रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अनुभवली पंढरीची वारी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणसाठयाने गाठली मागील वर्षाची सरासरी

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT