Mainpuri By-Election 2022 esakal
देश

Lok Sabha Election : मुलायम सिंहांच्या जागेवरून लढणार सुनबाई; पक्षाकडून डिंपल यादवांचं नाव जाहीर

मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर त्यांची सून डिंपल आता रिक्त झालेल्या मतदारसंघाचा वारसा सांभाळणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर त्यांची सून डिंपल आता रिक्त झालेल्या मतदारसंघाचा वारसा सांभाळणार आहेत.

Mainpuri By-Election 2022 : समाजवादी पक्षानं अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) यांना लोकसभा मतदारसंघ मैनपुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केलंय. सपा संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर त्यांची सून डिंपल आता रिक्त झालेल्या मैनपुरी मतदारसंघाचा (Mainpuri Lok Sabha By-Election) वारसा सांभाळणार आहे.

आज (गुरुवार) समाजवादी पक्षानं (Samajwadi Party) याची अधिकृत घोषणा केली. ही निवडणूक 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचं गेल्या महिन्यात दीर्घ आजारानं निधन झालं. मैनपुरी लोकसभा जागेसोबतच पाच राज्यांतील पाच विधानसभा जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगानं उत्तर प्रदेशच्या रामपूर सदर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे.

सपा नेते मोहम्मद आझम खान यांना अपात्र ठरवल्यानंतर रामपूर विधानसभा जागा रिक्त झाली होती. खान, जे रामपूरचे आमदार होते, त्यांना एप्रिल 2019 मध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्यात आलं. काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांच्या निधनानंतर राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील सरदारशहर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. याशिवाय ओडिशातील पदमपूर, बिहारमधील कुधनी आणि छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर या इतर विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT