arvind kejriwal esakal
देश

'डिनर विथ केजरीवाल!' निवडणूकांसाठी 'आप'चा नवा फंडा आहे तरी काय?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (Aap) एक नवा फंडा सुरू केला आहे. 'आप'चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (arvind kejariwal) यांनी 'एक मौका केजरीवाल को' ही डिजिटल मोहीम पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू करत दिल्लीकरांना एक आवाहन केले आहे. केजरीवालांनी काय आवाहन केले?

''तेच डिनरसाठी आमंत्रित''

त्यांनी दिल्लीतील लोकांना सांगितले की, "दिल्ली सरकारच्या चांगल्या कामांचे व्हिडिओ बनवा, ते ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर अपलोड करा आणि लोकांना सांगा की तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला? यासोबतच तुमच्या ओळखीच्या लोकांनाही आवाहन करा. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संधी द्या. केजरीवाल म्हणाले, "ज्या 50 दिल्लीकरांचे व्हिडिओ व्हायरल होतील, त्यांना निवडणुकीनंतर डिनरसाठी आमंत्रित केले जाईल."

हे सर्व शक्य झाले कारण..

केजरीवाल म्हणाले की, त्यांच्या सरकारने दिल्लीत मोफत वीज आणि पाणी देण्यासारखी अनेक चांगली कामे केली आहेत. ते म्हणाले, "युनायटेड नेशन्सचे लोक दिल्लीत सुरू असलेले मोहल्ला क्लिनिक पाहण्यासाठी आले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने येथील शाळांना भेट दिली. दिल्लीला आता 24 तास वीज मिळत आहे. हे सर्व शक्य झाले कारण दिल्लीच्या जनतेने आम्हाला संधी दिली."

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल करा

केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना असे व्हिडिओ शेअर करून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, "निवडणुकीनंतर मी 50 दिल्लीकरांसोबत डिनर करेन ज्यांचे व्हिडिओ व्हायरल होतील."

चार राज्यात करायचाय विस्तार

अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पंजाब (जेथे तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे), उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विस्तार करायचा आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात आम आदमी पक्ष हा प्रमुख दावेदार आहे. धुरी मतदारसंघातून पक्षाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांना उभे केले आहे.

AAP उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा जागा लढवत आहे, जिथे 10 फेब्रुवारीपासून सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. याशिवाय गोवा या समुद्रकिनारी असलेल्या आपल्या निवडणूक प्रचारात 'आप'ने भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा बनवला आहे. तिथेही आप ने सर्व 40 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टी निवृत्त कर्नल अजय कोथियाल यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT