disappointment on seat allocation in Bihar Pashupati Paras resigns from post of Minister
disappointment on seat allocation in Bihar Pashupati Paras resigns from post of Minister  Sakal
देश

Bihar Politics : बिहारमधील जागावाटपावरून रुसवेफुगवे; केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहारमध्ये ‘एनडीए’तील जागावाटपाला २४ तास होण्यापूर्वीच तेथील रुसवेफुगवे बाहेर आले असून, केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे ‘एनडीए’तील घटक असलेले उपेंद्र कुशवाहही नाराज असल्याने त्यांची मनधरणी सुरू आहे.

बिहारसाठी ‘एनडीए’ने सोमवारी सायंकाळी जागावाटप जाहीर केले. यात भाजपला १७, जेडीयूला १६, लोक जनशक्ती पक्षाला ५, जीतनराम मांझी व उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री पशुपती पारस यांना मात्र एकही मतदारसंघात स्थान दिले नाही.

त्यांनी हाजीपूर मतदारसंघावर दावा केला होता. परंतु या मतदारसंघातून चिराग पासवान यांनी निवडणूक लढविण्याचे घोषित केले आहे. या कारणामुळे केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ‘इंडिया’आघाडीत जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यांचे ‘इंडिया’ आघाडीत स्वागत असल्याचे तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे.

कुशवाहसुद्धा नाराज

एनडीए आघाडीतील जुने सदस्य उपेंद्र कुशवाह यांना केवळ एकच जागा मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांनी दोन जागांची मागणी केली होती. नाराज कुशवाह यांची मनधरणी करण्यासाठी बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी त्यांची भेट घेतली.

फातमी यांचा राजीनामा

पाटणा : संयुक्त जनता दलाचे (जेडीएस) राष्ट्रीय सरचिटणीस अली अश्रफ फातमी यांनी पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रीय जनता दल या आपल्या मूळ पक्षात परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फातमी यांनी पक्षाचे अध्यक्ष नितीशकुमार यांना पत्र लिहित राजीनामा दिला आहे.

माझ्या नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी मी राजीमाना देत असल्याचे फातमी यांनी म्हटले आहे. भाजप आणि जेडीएसमधील जागावाटपात फातमीचा दरभंगा मतदारसंघ भाजपकडे गेला आहे. या मतदारसंघातून फातमी चार वेळा विजयी झाले आहेत. त्यामुळेच नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडल्याचे मानले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT