INDIA Opposition Alliance Member Esakal
देश

INDIA आघाडीच्या जागावाटपाबाबत आज काँग्रेस-आपमध्ये चर्चा; दिल्ली, पंजाबच्या जागावाटपाचा तिढा सुटणार?

INDIA Opposition Alliance Member - दिल्ली आणि पंजाबमधील जागा वाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यामध्ये तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा कसा सोडविला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

आम आदमी पक्षासोबत जागावाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेसची सोमवारी बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी येथे दिली. दरम्यान, बिहारमधील जागावाटपाच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय जनता दलासोबत चर्चा झाल्याचे खुर्शिद यांनी सांगितले. काँग्रेसने बिहारमधील नऊ जागांवर दावा ठोकला असल्याचे समजते

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या अनुषंगाने काँग्रेसच्या तीन दिवसीय बैठक सत्राची सुरुवात झाली आहे. दिल्ली आणि पंजाबमधील जागा वाटपाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यामध्ये तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा कसा सोडविला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील लोकसभेच्या सर्वच्या सर्व १३ जागांवर हक्क सांगितला आहे. तर दिल्लीतील सर्व सात जागांवरही दावा ठोकला आहे.

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. यातील प्रत्येकी १७ जागा संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल(आरजेडी) लढविणार आहे. उर्वरित सहा जागा काँग्रेस आणि डाव्या पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. जागा वाटपासाठी रविवारी झालेल्या बैठकीस काँग्रेसकडून मुकुल वासनिक, सलमान खुर्शिद, अशोक गेहलोत, बिहार प्रभारी मोहन प्रकाश, भूपेश बघेल आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश सिंह हे उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आभासी माध्यमातून या बैठकीला उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मतदारसंघनिहाय समन्वयकांची नियुक्ती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मतदारसंघनिहाय समन्वयकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पुणे, बारामती आणि शिरूर मतदारसंघासाठी क्रमशः डॉ. विश्वजित कदम, रामविजय बुरुंगले आणि ॲड. रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर आणि शिर्डी मतदारसंघाचे समन्वयक म्हणून क्रमशः मोहन जोशी व बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अन्य नियुक्त्या पुढीलप्रमाणे- नारायण पवार (बीड), सिद्धराम म्हेत्रे (उस्मानाबाद), संग्राम थोपटे (लातूर), बसवराज पाटील (सोलापूर), संजय बालगुडे (माढा), सतेज ऊर्फ बंटी पाटील (सांगली), रवींद्र धंगेकर (सातारा), अशोक जगताप (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), पृथ्वीराज चव्हाण (कोल्हापूर), अभय छाजेड (हातकणंगले), हुसेन दलवाई (मावळ), चारुलता टोकस (रायगड), वीरेंद्र बक्षी (मुंबई दक्षिण), अशोक जाधव (मुंबई दक्षिण मध्य), अमीन पटेल (मुंबई उत्तर मध्य), बलदेव खोसा (मुंबई नॉर्थ ईस्ट), अस्लम शेख (मुंबई नॉर्थ वेस्ट), मधू चव्हाण (मुंबई उत्तर), अनिस अहमद (भिवंडी), सुरेश तावरे (पालघर), अमित देशमुख (नाशिक), अनिल पटेल (दिंडोरी), सुरेश वरपुडकर (छ. संभाजीनगर), वजाहत मिर्झा (जालना), रजनी पाटील (परभणी), विजय वडेट्टीवार (नांदेड), अशोक चव्हाण (हिंगोली), सुभाष धोते (यवतमाळ - वाशीम), सतीश चतुर्वेदी (चंद्रपूर), अभिजित वंजारी (गडचिरोली-चिमूर), नाना गावंडे (भंडारा-गोंदिया), प्रा. वीरेंद्र जगताप (नागपूर), डॉ. सुनील देशमुख (रामटेक), डॉ. नितीन राऊत (वर्धा), चंद्रकांत हंडोरे (अमरावती), वसंत पुरके (अकोला), रणजित कांबळे (बुलढाणा), प्रणिती शिंदे (रावेर), यशोमती ठाकूर (जळगाव), आरिफ खान (धुळे) आणि कुणाल पाटील (नंदुरबार).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT