Yogi Adityanath-Shivpal sakal
देश

काका-पुतण्यात पुन्हा ‘दीवार’

योगी आदित्यनाथ-शिवपाल भेटीची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सपचे प्रमुख अखिलेश यादव आणि काका शिवपाल यांच्यातील मतभेदांची दरी आणखी रुंदावली आहे. बुधवारी शिपवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. शिवपाल यांना राज्यसभेसाठी संधी, त्यांचा मुलगा आदित्य याला आझमगढमधून उमेदवारी अशा पर्यायांबाबत चर्चा झाल्याचे समजते.शिवपाल यांनी २०१७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच सपमधून बाहेर पडत वेगळा पक्ष काढला. त्यांनी प्रगतिशील समाजवादी पक्षाची चूल मांडली असली तरी सपमध्ये त्यांचे अजूनही लक्षणीय वजन असल्याचे मानले जाते.

निवडणुकीपूर्वी अखिलेश आणि शिवपाल यांनी वेगवेगळ्या रथयात्रा काढल्या होत्या. अखेरीस ते एकत्र आले होते. निकालानंतर मात्र त्यांच्यातील मतभेद उफाळून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मार्च रोजी शिवपाल हे अखिलेश यांना भेटले. सपमध्ये आपल्याला आणखी मोठी भूमिका मिळावी अशी मागणी त्यांनी केली, मात्र तुम्ही सपचे सदस्य नसून केवळ मित्रपक्ष आहात असे अखिलेश यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर अखिलेश यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी शिवपाल यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे दुरावा पुन्हा स्पष्ट झाला. याबद्दल अखिलेश यांच्याकडे शिवपाल यांनी विचारणा केली, त्यावेळी सपच्या मित्रपक्षांची वेगळी बैठक लवकरच बोलाविण्यात येईल, असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.या पार्श्वभूमीवर शिवपाल हे योगींना भेटले. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी सुमारे अर्ध्या तासाच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे स्पष्ट आहे.

या निवडणुकीत अखिलेश यांनी योगी यांचे एकमेव विरोधक म्हणून आपले स्थान बरेच भक्कम केले. अशावेळी २०२४च्या लोकसभा निवडणूकीच्यादृष्टिने हालचाली करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिपवाल भाजपमध्ये आले तर आपल्याबरोबर सपचे किमान पाच आमदार आणतील असे सांगितले जाते. तसे झाल्यास अखिलेश यांना धक्का बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT