Uttar Pradesh CM Yogi Adityanath issues strict warning after firing incident at actress Disha Patani’s residence.

 

esakal

देश

Yogi Adityanath warning : दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार प्रकरण; आता खुद्द मुख्यमंत्री योगींनी दिलाय कडक इशारा!

Yogi Adityanath said strict action against criminals : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत एक मोठं विधान केलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Yogi Adityanath strict action : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी हिच्या घरावर काही दिवसआधी गोळीबार झाला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर पोलिसांनी वेगाने सूत्रं हलवत या प्रकरणातील आरोपींचे एन्काउंटर सुरू केलंय. त्यामुळे गुन्हेगारांच्या उराती धडकी भरत आहे. त्यात आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत एक मोठं विधान केलं आहे. याशिवाय, त्यांनी दिशा पाटणीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणावरूनही गुन्हेगारांना कडक इशारा दिलाय.

योगी म्हणाले,‘’गुन्हेगारांना आता उत्तर प्रदेशात स्थान मिळणार नाही. एक गुन्हेगार मारीचच्या वेशात आला होता, परंतु पोलिसांच्या गोळीने जखमी झाल्यावर तो ओरडला, "उत्तर प्रदेशात येणे चूक होती." कायदा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराचे असेच होईल.’’

याचबरोबर योगींनी स्पष्टपणे सांगितले की, राज्य सरकार गुन्हेगारांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेविरुद्ध किंवा कायदा आणि सुव्यवस्थेविरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच यावेळी त्यांनी पोलिस दलात महिलांच्या सहभागावरही विशेष भर दिला.

मुख्यमंत्री योगी म्हणाले, "तुम्ही काल पाहिले असेलच. महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला एक गुन्हेगार बाहेरून आला होता." तो कदाचित मारिचसारखा आत शिरला असेल, पण जेव्हा पोलिसांच्या गोळ्यांनी त्याच्या शरीराचा वेध घेतला, तेव्हा तो ओरडला अन् म्हणाला, "साहेब, मी चुकून उत्तर प्रदेशच्या सीमेवर घुसलो. मी पुन्हा असे करण्याचे धाडस करणार नाही.’’ तर आता महिला सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला याला सामोरे जावे लागेल..

याशिवाय योगी यांनी असंही सांगितलं की, पूर्वी मुलींची सुरक्षा आणि रोजगार धोक्यात होता. नोकरीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत होते, ज्यामुळे तरुणांची निराशा झाली. मात्र, आता सरकारने मुलींची सुरक्षा आणि रोजगार सुनिश्चित करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. मुलींची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिस सोडणार नाहीत. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव; प्रतितास १२० किमी वेगमर्यादा, ४२ हजार कोटींचा खर्च

Western Railway: पश्चिम रेल्वेवर फुकटे प्रवासी वाढले! सात महिन्यांत १२१.६७ कोटी दंड

Delhi IGI Airport: एयरपोर्टवर १५ तासांचा तांत्रिक अडथळा, विमान वाहतूक पुन्हा सुरळीत

Latest Marathi Breaking News Live: राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचं बक्षिस, बच्चू कडू

Nashik Crime : सावकाराच्या बायकोने पोलिसांना धमकावले; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT