Ghaziabad police encounter with shooters involved in the firing outside actress Disha Patani’s residence.
esakal
Disha Patani house firing incident shooter encounter in Ghaziabad : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या उत्तर प्रदेशमधील बरेली येथील घरावर आठवडभरापूर्वी गोळीबार झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती, आता या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
गाझियाबादच्या थाना टेक्नो सिटी परिसरात झालेल्या चकमकीत या प्रकरणातील कथित मुख्य आरोपी रवींद्र आणि अरुण हे दोघे शूटर्स ठार झाले आहेत. ही संयुक्त कारवाई यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि हरियाणा स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी केली.
ठार झालेल्या संशयितांची ओळख पटली असून ते रोहतकमधील कहानी येथील रहिवासी रवींद्र उर्फ कल्लू आणि सोनीपतमधील गोहना रोड येथील रहिवासी अरुण अशी आहे. दोन्ही शूटर कुख्यात गुंड गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीचे सक्रिय सदस्य होते. घटनास्थळावरून पिस्तूल आणि अनेक काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
बरेलीत १२ सप्टेंबर रोजी पहाटे दिशा पटानीच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी सुमारे नऊ राउंड फायर केले होते. एवढंच नाहीतर या हल्ल्यानंतर, टोळीने सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती. याचबरोबर असा दावा केला होता की हा अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी हिने धर्मोपदेशक प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीचा हा बदला आहे.
या घटनेनंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिशा पटानी यांचे वडील आणि माजी डीएसपी जगदीश पटानी यांच्याशी फोनवर बोलून कुटुंबाला सुरक्षेचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्यासाठी तब्बल अडीच हजारांहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.