Disney plus Hotstar down hotstar service crashes during india vs aus test match users unable to access accounts
Disney plus Hotstar down hotstar service crashes during india vs aus test match users unable to access accounts  
देश

Hotstar Down : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान हॉटस्टार क्रॅश; यूजर्स वैतागले

सकाळ डिजिटल टीम

Disney Plus Hotstar Down : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान OTT आणि लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar च्या सेवा डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. खाते वापरताना यूजर्सना अडचणी येत आहेत. युजर्सनी ट्विटरवर लॉगिन न होण्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारने देखील सेवा ठप्प झाल्याचे कन्फर्म केले आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टार ने या आउटेजवर प्रतिक्रिया देत आमच्या अॅप्स आणि वेब सेवांना तांत्रिक समस्या येत आहेत आणि आमती टीम यावर काम करत आहे आणि लवकरच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सुरळीत केला जाईल असे सांगितले आहे.

डाउन डिटेक्टरने देखील आउटेजच्या 500 हून अधिक घटनांची नोंद केली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान हॉटस्टार डाउन झाल्याची तक्रार युजर्स ट्विटरवर करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना त्यांना मिळालेल्या एरर मेसेजचा स्क्रीनशॉट देखील ट्विटरवर शेअर केला आहे. वापरकर्ते म्हणतात की ते हॉटस्टार अॅप उघडू शकत नाहीयेत. मिळालेल्या एरर मेसेजचा स्क्रीनशॉटही ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

याच शहरांमध्ये सर्वाधिक समस्या

भारतातील प्रमुख शहरांमधील वापरकर्त्यांना हॉटस्टार वापरण्यात अडचणी येत आहेत. सर्वात जास्त समस्य दिल्ली, लखनऊ, नागपूर, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसत आहे. डाउन डिटेक्टरनुसार, लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची सेवा सुमारे तासभर बंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT