पोलावरम उजव्या मुख्य कालव्याची क्षमता १७५०० क्युसेकवरून ३८ हजार क्युसेकपर्यंत वाढवून गोदावरीचे पाणी कृष्णा नदीकडे वळवणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. गुंटूर जिल्ह्यातील बोल्लापल्ली जलाशयाच्या माध्यमातून २८ हजार क्युसेक पाणी उचलले जाईल आणि बनकचेरला जलाशयाकडे पाठवले जाईल. आंध्र प्रदेशातील दुष्काळग्रस्त रायलसीमा प्रदेशाचे सुपीक भूमीत रूपांतरित करणे हा प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.
हरिश्चंद्रपुरम, लिंगापुरम, व्यंदना, गंगिरेड्डीपल्ली आणि नाकिरेकल्लू येथे ‘पंपिंग स्टेशन’ बांधून बोल्लापल्ली जलाशयापर्यंत पाणी पोहोचविण्यात येईल. नल्लामला जंगलातून बोगदा बांधून पाणी या जलाशयांकडे वळवले जाईल.
आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गोदावरी नदीला कृष्णा नदीतून पेन्ना नदीशी जोडण्याची योजना जाहीर केली आहे; तसेच नांद्याळ जिल्ह्यातील बनकचेरला येथे एक मोठा जलाशय बांधण्याचेही प्रस्तावित केले आहे. तेलंगण सरकार या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहे. सन २०१४ च्या आंध्र प्रदेश कायद्याचे हे उल्लंघन आहे, असे तेलंगण सरकारचे म्हणणे आहे. बनकचेरलाकडे वाहून नेण्यात येणारे पाणी हे गोदावरीचे अतिरिक्त पाणी आहे, त्यामुळे तेलंगणाच्या हितावर आघात होणार नाही, अशी आंध्र प्रदेश सरकारची भूमिका आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्रसमितीचे नते के. चंद्रशेखर राव यांना बनकचेरला प्रकल्पावरून थेट विधानसभेत चर्चेचे आव्हान दिले आहे. ‘बीआरएस’ने या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. तेलंगणच्या नागरिकांसाठी हक्काच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळे याची चर्चा थेट विधानसभेत होणे आवश्यक असल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि सिंचनमंत्री उत्तमकुमार रेड्डी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना पत्र लिहू या प्रकल्पाला विरोध केला आहे. या पत्रातील दाव्यानुसार, हा प्रकल्प कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या पाण्याच्या वाटपावर परिणाम करणार असून, ते तेलंगणाच्या हिताच्या विरोधात आहे. कायद्यानुसार, दोन्ही राज्यांना समान हक्काने नद्यांचे मिळावे; पण आंध्र प्रदेशाच्या या योजनेमुळे तेलंगणाचा पाण्यावरील हक्क धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे, केंद्र सरकारने हा प्रकल्प थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चंद्राबाबू नायडू यांचा बनकचेरला प्रकल्पातील रस हा रायलसीमा प्रदेशातील (विशेषतः कडपा, अनंतपूर, नांद्याळ) पाणीटंचाईचे निराकरण करून तेथे ‘तेलगू देसम पक्षा’ची राजकीय ताकद वाढवणे यासाठी आहे. हा प्रदेश सध्या ‘वायएसआर काँग्रेस’ पक्षाचा किल्ला आहे. येथील पाणीटंचाई दूर झाली, तर तेलगू देसमला या भागात मतदानात फायदा होण्याची शक्यता आहे. तेलंगणच्या स्थापनेवेळी तेलंगणचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळविले जात आहे, असा आरोप होत होता. आता गोदावरीचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळविण्यात आल्याचा आरोप करून तेलंगण याविरोधात उभा ठाकला आहे.
गोदावरी-बनकचेरला प्रकल्पावरून आंध्र प्रदेश आणि तेलंगण ही दोन राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी या प्रकरणावरून आक्रमक झाले आहेत. काय आहे या प्रकल्पाचा वाद?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.