Padma Vibhushan  Team eSakal
देश

फर्नांडीस, स्वराज, जेटलींना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्करांचं वितरण

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं आहे.

सुधीर काकडे

राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या वतीने कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे उपस्थित होते.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 119 पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. या वर्षीच्या यादीत 7 पद्मविभूषण, 10 पद्मविभूषण आणि 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी 29 महिला आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला पद्मविभूषण तर गायक अदनान सामीला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या वतीने त्यांची कन्या बन्सुरी स्वराज आणि अरुण जेटली यांच्या वतीने त्यांच्या पत्नी संगीता जेटली यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1954 साली स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात येते. या पुरस्कारांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लोकांच्या 'उत्कृष्ट कार्य किंवा योगदानाचा सन्मान करण्यात येतो. हे पुरस्कार विशिष्ट कामगिरी, वेगवेळ्या क्षेत्रातील सेवा, कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक , विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT