esakal
देश

Diwali 2022 : यंदा दिवाळीत बिना रिझर्वेशन करू शकतात प्रवास, IRCTC ने केले जाहिर

दिवाळीला लोक मोठ्याप्रमाणावर प्रवास करतात, त्यामुळे या काळात कंन्फर्म तिकीट मिळणं कठीण होतं. पण तिकीट कंन्फर्म नसलं तरी तुम्ही आता ट्रेनने प्रवास करू शकाल.

सकाळ डिजिटल टीम

Festival Special Train : दिवाळीला रेल्वे बुकिंगसाठी लोकांची झुंबड लोटते. पण या काळात तिकीट मिळणं सुध्दा कठीण असताना कंन्फर्म तिकीट मिळणं अजूनच अवघड होतं. अशात रेल्वेत वाढणारी गर्दी लक्षात घेऊन IRCTC ने एक मोठी घोषणा केली आहे. तुमचे तिकीट वेटिंगवर असेल तरीही तुम्ही दिवाळी दरम्यन प्रवास करू शकाल. याशिवाय नव्या योजनेनुसार सणावाराच्या काळात बिना रिझर्वेशनपण प्रवास करता येणार आहे.

या योजनेचा कोणाला फायदा होणार जाणून घेऊ.

बिना रिझर्वेशन प्रवास

तुमचं तिकीट कंन्फर्म होऊ शकत नसेल तर तुम्ही वेटिंग तिकीटाने प्रवास करू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढावं लागेल आणि मग टीटी कडून तिकीट बनवून घ्यावं लागेल. जर तुमच्याकडे असं तिकीट असंल तर टीसी तुम्हाला प्रवास करण्यापासून अडवू शकत नाही.

ऑनलाईन तिकीटवाल्यांसाठी ही सुविधा नाही. जर ऑनलाईन तिकीट कंन्फर्म नाही झालं तर असे प्रवाशी प्रवास करू शकणार नाहीत. तुम्हाला तिकीटाचे पैसे परत मिळतील.

स्पेशल ट्रेन

तसंच याकाळात रेल्वेने स्पेशल गाड्या सोडण्याचं जाहीर केलं आहे. IRCTC या काळात १७९ स्पेशल ट्रेन सुरू करणार आहे. यातील बहुतांश रेल्वे पुर्वांचलसाठी असतील. इतर राज्यांमध्येही अशा स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

कंन्फर्म तिकीट कसं मिळवावं?

स्पेशल ट्रेनमुळे गाड्यांची संख्या वाढणार असली तरी प्रवासी संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळे कंन्फर्म तिकीट मिळवणं हा टास्क असणार आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर बुकींग करणं, तत्कालमध्ये बुकींग करणं हे पर्याय आहेतच. पण सध्याची परिस्थिती पाहता विंडो वरूनच तिकीट घेणं योग्य ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT