Diwali Gift  Sakal
देश

Tax On Diwali Gift : दिवाळीला तुम्हालाही मिळतात गिफ्ट? तर, भरावा लागेल टॅक्स

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, या काळात अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देतात.

सकाळ डिजिटल टीम

Tax On Diwali Gits : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या काळात अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देतात. तर, काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून रोख रक्कम किंवा भेटवस्तू देत असतात. मात्र, या दिवळीत तुम्हालाही अशा स्वरूपाच्या भेटवस्तू मिळणार असतील तर, तुम्हाला आयकर नियमांनुसार कर भरणे क्रमप्राप्त आहे.

सणासुदीच्याकाळात मिळालेल्या भेटवस्तू आयकर कायदा 1961 च्या कलम 56(2) अंतर्गत 'इतर स्त्रोतांकडून मिळकत' म्हणून गणले जाते. त्यामुळे जर, तुम्हाला एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या असतील, तर या स्लॅबनुसार करदेखील भरणे आवश्यक आहे.

आयकर कायद्यानुसार, एखाद्या कंपनीकडून गिफ्ट व्हाउचर किंवा 5,000 रुपयांपेक्षा कमी गिफ्ट मिळाल्यास कर आकारला जात नाही. परंतु, जर ही रक्कम आर्थिक वर्षात 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर, ती पगाराचा भाग मानली जाते. यावर कर्मचाऱ्याला कर भरावा लागतो.

मित्रांकडून मिळालेली भेटवस्तूदेखील करपात्र

सणासुदीच्या काळात मित्रांकडून मिळालेल्या भेटवस्तूंनादेखील इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मानले जाते. यासाठी एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एका आर्थिक वर्षात तुम्हाला 50 हजारांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू मित्रांकडून मिळाल्यास त्यासाठीदेखील तुम्हाला कर भरावा लागतो.

जर, तुमच्याकडे जंगम किंवा स्थावर मालमत्ता असेल तर...

तुम्हाला मिळालेली भेट मालमत्ता जंगम किंवा स्थावर असल्यास त्याचे मूल्य आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यातील फरक करपात्र मानला जातो. समजा, जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्याची मालमत्ता हस्तांतरित केली आणि तिचे मूळ मूल्य आणि मुद्रांक शुल्क मूल्य यांच्यातील फरक 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर, ही भेट करपात्र मानली जाते.

यावर भरावा लागत नाही कोणताही कर

पती, पत्नी, भाऊ, बहीण, पालक यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागत नाही. यामध्ये वारसा किंवा मृत्युपत्राद्वारे मिळालेली भेट किंवा मालमत्ता कराच्या अखतारित येत नाही. याशिवाय हिंदू अविभक्त कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून मिळालेली भेटदेखील करप्राप्त नाही. आयकर कायद्याच्या कलम 10(23C) अंतर्गत कोणत्याही फंड/फाऊंडेशन किंवा इतर शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल किंवा इतर वैद्यकीय संस्था, ट्रस्टकडून मिळालेली भेटदेखील करात येत नाही. याशिवाय कलम 12A किंवा 12AA अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही धर्मादाय किंवा धार्मिक ट्रस्टकडून मिळालेली भेटदेखील करामध्ये गणली जात नाही.

दोन लाखांपेक्षा जास्त रोख भेटवस्तू स्वीकारू नका

जर, तुम्हाला दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम रोख स्वरूपात भेट म्हणून मिळाल्यास त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा दंड टाळण्यासाठी 2 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम स्वीकारणे शक्यतो टाळा. जर ही रक्कम तुम्ही स्वीकारणारच असाल तर ती चेक किंवा बँक ड्राफ्ट किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्सच्या माध्यमातूनच स्वीकारावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest: 5 वर्षांपासून पुण्यात राहून PSI होण्याचं स्वप्न... बाप शेतमजुरी करून पैसे पाठवतो, पण आयोग? विद्यार्थ्यांनी काय सांगितलं?

Pune Election Commission Report : दबावाखाली अर्ज माघारी? पुण्यातील बिनविरोध निवडणुकांवर आयोगाचा रिपोर्ट कार्ड

Panchang 3 January 2026: आजच्या दिवशी दशरथ विरचित शनिस्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Shubman Gill : शुभमन गिलला संघातून वगळले, पुनरागमन लांबणीवर पडले; निवड समितिच्या निर्णयाने सर्वच अचंबित

Pume Municipal Election : भाजपच्या अनेकांचे बंड झाले थंड

SCROLL FOR NEXT