Visuals from the accident site where Karnataka Deputy CM DK Shivakumar’s escort vehicle overturned on the Mysuru-Bengaluru highway, leaving a security personnel injured.  esakal
देश

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

Security Personnel Injured in DK Shivakumar’s Convoy car Accident: या दुर्घटनेत डीके शिवकुमार यांच्या सुरक्षा रक्षकास दुखापत झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

Mayur Ratnaparkhe

DK Shivakumar's Escort Car Overturns on Mysuru-Bengaluru Highway: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या वाहन ताफ्यातील कार म्हैसुर - बंगळुरु महामार्गावर उलटल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत डीके शिवकुमार यांच्या सुरक्षा रक्षकास दुखापत झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे एस्कॉर्ट वाहन शनिवारी दुपारी मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना तालुक्यातील टी एम होसुर गेटजवळ उलटले, त्यात बसलेले चार जण जखमी झाले.

शनिवारी म्हैसूर येथील एका कार्यक्रमाहून बंगळुरूला परतत असताना डी के शिवकुमार यांच्या गाडीच्या मागे येणारी गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या कारमधील जखमी झालेल्यांची नावं महेश, दिनेश, जयलिंगू आणि कार्तिक अशी समोर आली आहेत.

या जखमींना श्रीरंगपटना तालुका रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी म्हैसूर येथील के आर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT