DK Shivakumar’s latest statement stirs political controversy as Bihar’s oath-taking ceremony captures national attention.

 
esakal
देश

DK Shivakumar Statement : बिहारमध्ये शपथविधीची धामधूम, तर कर्नाटकात डीके शिवकुमारांच्या विधानाने राजकीय खळबळ!

DK Shivakumar’s latest statement : आतापर्यंत अनेकदा डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री बनणार असल्याच्या चर्चांना पेव फुटल्याचे आपल्याला दिसून आलेलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Karnataka Congress Political Update : एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे कर्नाटकातही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याला कारण, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केलेलं एक सूचक वक्तव्य ठरत आहे. कारण, आतापर्यंत अनेकदा डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री बनणार असल्याच्या चर्चांना पेव फुटल्याचे आपल्याला दिसून आलेलं आहे. खरंतर वारंवार या चर्चा खुद्द डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नाकारलेल्या आहेत. मात्र तरीही अधूनमधून अशी काही विधानं समोर येतात की पुन्हा एकदा डीके शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यंमत्री बनणार असल्याचे बोलले जावू लागते.

आता पुन्हा एकदा या चर्चांना अधिक बळ देणारं विधान समोर आलं आहे आणि विशेष म्हणजे यावेळी खुद्द डीके शिवकुमार यांनीच हे विधान केलं आहे. त्यांनी गलुरू येथे इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात म्हटले की, ‘’मी या पदावर कायम नाही राहू शकत. या पदावर राहून मला साडेपाच वर्षे झाली आहेत. यावर्षी मार्चमध्ये सहा वर्षे पूर्ण होतील. कोणतंच पद नेहमीसाठी नसतं.’’

डीके शिवकुमार यांच्या या वक्तव्यानंतर आता कर्नाटकात उलसुलट राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. शिवाय, असंही बोललं जात आहे की, शिवकुमार आता लवकरच कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे पद सोडणार आहेत.

विशेष म्हणजे डीके शिवकुमार यांनी स्वत: सांगितले की, आता या पदासाठी दुसऱ्या नेत्यांनाही संधी दिली गेली पाहीजे. याचबरोबर ते हेही म्हणाले की ते काँग्रेसचे पहिल्य फळीतील नेते म्हणून कायम राहतील. ते म्हणाले की, मी लीडरशीपमध्येच राहील. तुम्ही लोक चिंता करू नका, मी पहिल्या लाईनमध्ये असेल. मी असलो किंवा नसलो याने काहीच फरकत पडत नाही. माझा प्रयत्न आहे की, आपल्या कार्यकाळात मी पक्षाचे १०० कार्यालयं बनवू.

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांची मे २०२० मध्ये कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मे २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा त्यांचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना आणखी काही काळ या पदावर राहण्याचा आग्रह केला. म्हणूनच त्यांनी त्यावेळी राजीनामा दिला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

SCROLL FOR NEXT