DK Shivakumar  and Siddaramaiah News
DK Shivakumar and Siddaramaiah News 
देश

DK Shivakumar News : कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी चुरस! डिके शिवकुमार निघाले अध्यात्मिक गुरूंच्या भेटीला

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणुकेचे निकाल काल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार करत भाजपला सत्तेतून खाली खेचलं. काँग्रेसच्या या ऐतिहासिक विजयात कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डिके शिवकुमार यांची भूमिका मोठी राहिली आहे.

आता सर्वांच्या नजरा काँग्रेसमधून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान निवडणूकीतील या विजयानंतर शिवकुमार हे त्यांच्या अध्यात्मिक गुरुंच्या भेटीला निघाले आहेत. (DK Shivakumar going to meet his spiritual guru Ajjayya)

डिके शिवकुमार यांनी सांगिलतलं की, मी माझे अध्यात्मिक गुरू, अजय्या यांना भेटण्यासाठी नोनाविनाकेरेला जात आहे. ते माध्यमांशी बोलताना सांगितेल. तसेच कालच्या निकालावर बोलताना ते म्हणाले की, मी सांगितले होतं की आमची संख्या 136 असेल. काल कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला 135 जागांसह पूर्ण बहुमत मिळाले आहे.

मुख्यमंत्री कोण होणार?

कर्नाटकात काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाच्या एका दिवसानंतर , सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यापैकी एकाची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याच्या पक्षासमोरील पुढील मोठ्या आव्हान आहे. पक्षाच्या या निर्णयाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश, जे काँग्रेसचे खासदार आहेत, ते म्हणाले की, एक भाऊ म्हणून आणि सामान्य माणूस म्हणूनही, डीके मुख्यमंत्री झाल्यास त्यांना सर्वात जास्त आनंद होईल.

दरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज संध्याकाळी 5.30 वाजता बैठक होणार असून त्यात आमदार कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यासाठी मतदान करतील. पक्षाकडून सर्व आमदारांना बेंगळुरूला जाण्यास सांगण्यात आले आहे.

निकाल काय लागला?

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी ११३ जागा बहुमताचा आकडा आहे. हा आकडा काँग्रेसनं पार केला असून १३६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपनं ६५ जागा जिंकल्या आहेत. तर जनता दल सेक्युलर या पक्षाला १९ जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अपक्ष आणि प्रत्येकी एका जागेवर कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्ष यांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

दरम्यान, पक्षनिहाय मतांची विभागणी पाहिल्यास यामध्ये काँग्रेसला ४२.९८ टक्के, भाजपला ३५.९१ टक्के तर जेडीएसला १३.३३ टक्के मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२७ टक्के आणि नोटाला ०.६९ टक्के मतं मिळाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

SCROLL FOR NEXT