Congress Leader DK Shivkumar esakal
देश

Karnataka CM: 'मला मुख्यमंत्री करा, नाहीतर…', डी के शिवकुमारांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये तणाव

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्नाटकात काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसला बहुमत मिळालं. त्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यापैकी कुणाला मुख्यमंत्रिपद द्यायचं यावरून पक्षात चर्चा सुरू आहेत. कुणाच्या हातात राज्याची सत्ता द्यावी यासाठी काँग्रेसमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत.

13 मेला कर्नाटकचा निकाल लागला त्यानंतर आज चार दिवसांनंतरही कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अशातच डी के शिवकुमार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी शिवकुमार यांनी खर्गेंकडे मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका मांडली. त्यांनी खर्गे यांच्याकडे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच २०१९ मध्ये काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर राज्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यात मदत केली, असंही डीके शिवकुमार यांनी खर्गेंना सांगितलं असल्याची माहीती आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

यावेळी 'सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणाले आहेत.

डी के शिवकुमार यांच्या या वाक्याने काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यांच्या निर्णयाकडे काँग्रेस नेत्यांसह कर्नाटकच्या जनतेचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात, १४४ वर्षांची आहे परंपरा

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT