Do not interfere in Gyanvapi matters Do not interfere in Gyanvapi matters
देश

मदनी मुस्लिम संघटनांना म्हणाले, ज्ञानवापी प्रकरणात ढवळाढवळ करू नका

सकाळ डिजिटल टीम

जमीयत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद असद मदनी (Maulana Mahmood Asad Madani) यांनीही वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद वादात उडी घेतली आहे. मदनी यांनी बुधवारी मुस्लिम संघटनांना ज्ञानवापी मशीद वादात हस्तक्षेप करू नये असे सांगितले. ज्ञानवापी मशीद वादाचे प्रकरण सध्या सार्वजनिक आणि न्यायालयीन अशा दोन्ही पातळ्यांवर चर्चेत आहे. (Do not interfere in Gyanvapi matters)

काही नापाक घटक आणि पक्षपाती माध्यमे धार्मिक भावना भडकावून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुस्लिम संघटनांना ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi masjid) मुद्द्यावर रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. सार्वजनिक निदर्शने टाळावे. मस्जिद इंतेजामिया कमिटी (मशीद व्यवस्थापन समिती) या प्रकरणी देशातील विविध न्यायालयांमध्ये पक्षकार आहे. हे प्रकरण ते शेवटपर्यंत खंबीरपणे लढतील, असा विश्वास आहे, असेही अधिकृत निवेदनात मदनी (Maulana Mahmood Asad Madani) म्हणाले.

देशातील इतर मुस्लिम संघटनांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या प्रकरणी कोणत्याही न्यायालयात थेट हस्तक्षेप करू नये. जर त्यांना या प्रकरणात मदत करायची असेल तर ते मशीद व्यवस्था समितीमार्फत करू शकतात. उलामा, वक्ते आणि टीव्हीवरील चर्चेपासून दूर राहा. सार्वजनिक आणि सोशल मीडियावर भडकाऊ वादविवाद देशाच्या किंवा राष्ट्राच्या हिताचे नाही, असेही मदनी म्हणाले.

१९९१ मध्ये वाराणसी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दावा करण्यात आला होता की, १६ व्या शतकात काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून ज्ञानवापी मशीद (Gyanvapi masjid) औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याच्या आदेशानुसार बांधण्यात आली होती.

सध्या पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या आवारात शृंगार गौरी आणि इतर मूर्तींची नियमित पूजा करण्याची मागणी केल्याने वादाला उधाण आले आहे. त्यानंतर कोर्टाने कॅम्पसची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले होते. सध्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT