देश

Knowledge Story : तुम्हाला OK चे फुलफॉर्म माहित आहे का?

आपल्यापैकी अनेक जण एखाद्या गोष्टीसाठी होकार द्यायचा असेल तर, ओके शब्दाचा वापर करतात.

सकाळ डिजिटल टीम

Knowledge Story : आपल्यापैकी अनेक जण एखाद्या गोष्टीसाठी होकार द्यायचा असेल तर, ओके या शब्दाचा वापर करत असतो. एवढेच नव्हे तर, हा दोन अक्षरी शब्द रोजच्या बालण्यातदेखील अनेकदा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मात्र, ओके हा शब्द नाहीये हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ओके हा एक शॉर्ट फॉर्म असून आज आम्ही तुम्हाला OK या शॉर्ट फॉर्म मागची रंजक माहिती सांगणार आहोत.

कधी सुरू झाली OK ची सुरुवात

OK हा ग्रीक शब्द असून, ज्याचा फुलफॉर्म 'ओल्ला कल्ला' असा असून, याचा इंग्रजीतील ऑल करेक्ट असा होतो. OK या शब्दाची उत्पत्ती 183 वर्षांपूर्वी झाली होती. या शब्दाचा वापर अमेरिकन पत्रकार चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांच्या कार्यालयातून झाला होता. 1839 मध्ये चार्ल्स गोर्डोन ग्रीन एखाद्या शब्‍दाच्या जागी प्‍लेफुल एब्रीविएशंसचा वापर करत असत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही वापर

OK चा प्रथम वापर “Oll Korrect” या एब्रीविएशंससाठी वापरला गेला होता. खरे तर हा एक व्याकरणावरचा उपहासात्मक लेख होता. जो 1839 मध्ये बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. यानंतर OW सारखे शब्दही वापरात आले. याचा अर्थ "oll wright" किंवा all right असा होत असे. 1840 मध्ये, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मार्टिन व्हॅन बुरेन यांच्या पुनर्निवडणुकीच्या प्रचारात ओके हा शब्द वापरण्यात आला. त्यानंतर हा शब्द जगभर लोकप्रिय झाला.

वास्तविक, व्हॅन बुरेनचे (Van Buren) टोपणनाव ओल्ड किंडरहूक (Old Kinderhook) होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचारात ओके हा शब्द वापरला. या काळात देशभरात ओके क्लब (OK Clubs ) तयार करण्यात आले होते. त्यानंतर ओके हा दुहेरी अर्थाचा शब्द झाला ज्याचा अर्थ ओल्ड किंडरहूक आणि ऑल करेक्ट असाही होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT