service charge
service charge sakal
देश

मनमानी Service Charge वर बसणार लगाम, केंद्राकडून लवकरच निर्णय

सकाळ डिजिटल टीम

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स कडून आकारले जाणारे सर्विस चार्जवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मनमानी सर्विस चार्जमुळे ग्राहक वर्गात नाराजी आहे मात्र यावर लवकरच तोडगा निघणार आहे. याकरीता डीओसीए विभाग पावले उचलत आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स कडून आकारले जाणाऱ्या मनमानी सर्विस चार्जबाबत डीओसीए विभाग (DOCA) लवकरच फ्रेमवर्क तयार करणार आहे.या फ्रेमवर्कमुळे मनमानी सर्विस चार्ज आकारणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात येईल. याबाबत डीओसीए विभागाने गुरुवारी रेस्टॉरंट असोशिएशन आणि ग्राहक संघटनांसोबत बैठक घेतली. (DOCA will prepare a framework for investigation on arbitrary service charge

या बैठकीत नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) आणि फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (FHRAI)तसेच अनेक ग्राहक संघटनांनी हजेरी लावली होती. या बैठकीत ग्राहकांनी सर्विस चार्जबाबत DOCA च्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर (National Consumer Helpline) केलेल्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय, सर्विस चार्जशी संबंधित निष्पक्ष व्यापार पद्धतींवर मार्गदर्शक तत्त्वेही यावेळी जारी करण्यात आली.

बैठकीदरम्यान, रेस्टॉरंट संघटनांना असे आढळून आले की जेव्हा मेनूवर सर्विस चार्ज लिहिलेले असते तेव्हा ग्राहक पैसे देण्यास तयार असतात. सर्विस चार्ज रेस्टॉरंट किंवा हॉटेलच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिला जातो परंतु जेवण सर्व्ह करण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही चार्ज आकारले जात नाही तर ग्राहक संघटनांच्या मते सर्विस चार्ज आकारणे पूर्णपणे मनमानी आहे तसेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अन्यायकारक आहे. सर्विस चार्ज ऐच्छिक असल्याची बाब या बैठकीत मांडण्यात आलीअशाप्रकारे सर्विस चार्जवर या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT