hathras main.jpg
hathras main.jpg 
देश

हाथरस प्रकरणः FSL अहवालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या डॉक्टरला कामावरुन काढलं

सकाळ वृत्तसेवा

लखनऊ- हाथरस येथील एका दलित युवतीवर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणातील एफएसएल अहवालावर प्रश्न उपस्थित करणारे अलीगढ येथील डॉक्टर अझीम मलिक यांना जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमधील नोकरी गमवावी लागली आहे. डॉ. मलिक हे त्या रुग्णालयातील इमर्जन्सी अँड ट्रॉमा सेंटरमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहत होते. हाथरस पीडितेचा एमएलसी अहवालही यांच्याच टीमने तयार केला होता. डॉ. मलिक यांच्याशिवाय त्यांचे सहकारी डॉ. ओबेद हक यांनाही काढण्यात आले आहे. डॉ. हक यांनी पीडितेच्या मेडिकल लीगल केस रिपोर्टवर स्वाक्षरी केली होती. 

'एनडीटीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या एफएसएल रिपोर्टच्या आधारावर तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे म्हटले होते. यावर डॉ. मलिक यांनी एफएसएलचे नमुने हे 11 दिवसानंतर घेतले होते. सरकारी गाइडलाइन्सनुसार बलात्कारानंतर 96 तासाच्या आत हे नमुने घेणे आवश्यक आहे. तेव्हाच बलात्कार झाला की नाही हे समजू शकते, असे म्हटले होते. मंगळवारी जेएनएमसीएचचे सीएमओ डॉ. शाह झैदी यांनी पत्र लिहून तत्काळ प्रभावाने त्यांना नोकरीतून काढण्यात आल्याचे कळवले

दुसरीकडे, डॉ. मलिक आणि डॉ. ओबेद यांच्या नोकरीवरुन काढण्याचा आणि हाथरस प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्रशासनाने म्हटले आहे. कोविडमुळे काही डॉक्टर आजारी होते. त्यामुळे या दोघा डॉक्टरांना 'लिव्ह व्हेकन्सी'वर घेतले होते. आता त्यांच्या सेवेची गरज नाही, असे त्यांनी म्हटले तर डॉ. मलिक यांनी मात्र हाथरस प्रकरणी आम्ही प्रसारमाध्यमांशी बोलल्याची ही शिक्षा असल्याचे सांगितले.  

दरम्यान, मागील महिन्यात 14 सप्टेंबर रोजी हाथरसमधील एका गावात 20 वर्षाच्या एका दलित युवतीवर शेतात गावातील सवर्ण जातीतील चार युवकांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिला अत्यंत निर्दयीपणे मारले होते. उपचारादरम्यान पीडित युवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात या घटनेवरुन संताप व्यक्त करण्यात आला होता. देशभरात जागोजागी आंदोलने करण्यात आली होती. उत्तर प्रदेश सरकारविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोहीम उघडली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT