देश

Ram Mandir: मोदींच्या व्हिसासाठी अमेरिकेसोबत लढणाऱ्या डॉक्टरला मिळालं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण; कोण आहे ही खास व्यक्ती? जाणून घ्या

राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आली आहेत. यामध्ये एक अशी व्यक्तीही आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास आहे ही व्यक्ती म्हणजे डॉ. भरत बरई. पंतप्रधान मोदींना अमेरिकेनं दहा वर्षांसाठी व्हिसा बंदी केली होती. हा व्हिसाचा क्लिअरन्स मिळवून देण्यात डॉक्टर बरई यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. (Doctor who fought for Narendra Modis visa became Ayodhya Ram Mandir invitees)

कोण आहेत डॉ. भारत बरई?

डॉ. भरत बरई हे ऑन्कोलॉजिस्ट असून सध्या अमेरिकेतील हिंदू युनिव्हर्सिटीत कॅन्सर इन्स्टिट्यूट मेथडिस्ट हॉस्पिटल आणि क्लिनिकल असिस्टंटचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंडियाना युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमध्ये प्राध्यापक तसेच इंडियाना राज्याच्या मेडिकल लाईसेंसिंग बोर्डाचे सचिव आणि माजी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. (Latest Marathi News)

मोदींना पुन्हा व्हिसा मिळवून देण्यासाठी बजावली महत्वाची भूमिका

डॉ. भरत बरई यांचं अमेरिकेतील राजकीय वर्तुळात चांगलं वाजन आहे. त्यामुळं त्यांनी सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिसाच्या क्लिअरन्ससाठी लॉबिंग केलं होतं.

इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं याचा उल्लेख केला आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. पण गुजरातमधील गोध्रा हत्याकांडानंतर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यांच्या व्हिसावर अमेरिकेनं १० वर्षांसाठी बंदी घातली होती. (Marathi Tajya Batmya)

डॉ. बरई यांनी भाजपला कायमचं पाठिंबा दिला असून त्यांनी भाजपच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना अनेकदा अमेरिकेतील आपल्या घरी निमंत्रित केलं होतं. तसेच भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध घट्ट करण्यासाठी देखील डॉ. भारत बरई यांनी काम केलं आहे.

तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी निधी उभारण्याचं कामही त्यांनी केलं होतं. तसेच ओबामांना भारतात लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींना भारतात येऊन पाठिंबा दर्शवण्याच्या कार्यक्रमासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.  (Latest Maharashtra News)

त्याचबरोबर डॉ. बरई यांनी गुजरातमध्ये मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी ६५० एनआरआय लोकांची टीम बोलावली होती. तसेच विविध मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांसाठी देखील त्यांनी प्रचार कार्यक्रम राबवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT