doctor  
देश

डॉक्टरने होणाऱ्या बायकोचे न्यूड फोटो केले पोस्ट; संतप्त पीडितेने भावी नवऱ्याला संपवलं

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : बंगळुरू पोलिसांनी 27 वर्षीय डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. मयत डॉक्टरचा खून त्याच्या होणाऱ्या बायकोनेच केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे तिने सूड घेण्यासाठी डॉ. विकास राजन याला ठार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. (Crime News in Marathi)

या घटनेचा कट उघड झाला आहे. डॉ. राजन राजन यांनी एमबीबीएसची पदवी युक्रेनमधून केली होती. चेन्नईतील रुग्णालयात प्रॅक्टिस केल्यानंतर तो नोकरीसाठी बंगळुरूला गेला होता. खासगी रुग्णालयात काम करण्यासोबतच डॉक्टर राजन परदेशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होता.

सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वास्तुविशारद प्रतिभा हिच्याशी ओळख झाली होती. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाला होकारही दिला होता.

दरम्यान आठवडाभरापूर्वी डॉ. राजन यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दुखापतीमुळे राजन कोमात गेला होता. त्यातच तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मात्र अंगावरील गंभीर जखमामुळे पोलिसांनी प्रथम अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती.

पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर असे आढळून आले की, 27 वर्षीय प्रतिभा आणि तिच्या मित्रांनी डॉ. राजन याच्यावर कथित हल्ला केला होता. त्यानंतर डॉ. राजनची प्रकृती खालावल्याने त्याना रुग्णालयात दाखल केले होते.

दक्षिण-पूर्व बंगळुरूचे पोलिस उपायुक्त सीके बाबा यांनी सांगितले की, प्रतिभाला काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर तिचे नग्न फोटो दिसून आले होते. याबद्दल तिने डॉ. राजनला विचारले, त्यावर राजनने तिला सांगितलं की, त्याने एक बनावट आयडी तयार केला आहे. तसेच मनोरंजनासाठी इन्स्टाग्रामवर तिचे न्यूड फोटो शेअर केले. मात्र यामुळे प्रतिभा संतापली आणि तिने राजनला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान 10 सप्टेंबर रोजी प्रतिभाने डॉ. राजनला तिच्या मैत्रीनीच्या घरी नेले. तिथं दोघांमध्ये वाद झाला. या वादात प्रतिभा आणि तिच्या मित्रांनी डॉ. राजन यांना मारहाण केली. या मारहाणीत राजनला गंभीर दुखापत झाली. प्रकृती बिघडल्याने प्रतिभाने राजनला रुग्णालयात नेले, मात्र तिथे तो कोमात गेले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT