PM Modi 
देश

Doda Bus Accident: PM मोदींकडून सांत्वन अन् मृतांसाठी मोठी नुकसान भरपाई जाहीर!

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई तसेच जखमी प्रवाशांना उपचारांसाठी मदत जाहीर केली आहे. (Doda bus accident PM Modi announces ex gratia of Rs 2 lakhs from PMNRF for deceased and Rs 50000 for injured)

मोदींकडून सांत्वन

पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की, जम्मू-काश्मीरच्या दोडा इथं झालेला बस अपघात खूपच दुःखदायक आहे. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्या लोकांना आणि प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती मी सांत्वन व्यक्त करतो. तसेच जे जखमी झाले आहेत, ते लवकरात बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. (Latest Marathi News)

मृतांना २ लाखांची मदत, जखमींना ५० हजार

या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल तसेच जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये दिले जातील, अशी घोषणा यावेळी पंतप्रधान मोदींनी केली. (Marathi Tajya Batmya)

अपघात कसा झाला?

ही बस किश्तवाडहून जम्मूला जात होती, यावेळी टेकडीवर चढाई आणि वळण एकत्रच असल्यानं ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण गेलं. त्यामुळं ही बस २५० मीटर खाली दरीत कोसळली. दोडा जिल्ह्यातील असर भागातील त्रुंगल येथे ही घटना घडली.

या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती दोडाचे एसएसपी अब्दुल कयूम यांनी दिली.

बचावकार्याची स्थिती काय?

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून अपघाताची माहिती दिली, तसेच दोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांच्याशी आपलं याबाबत बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. जखमींना किश्तवाड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आणखी काही लोकांच्या पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत आहे. घटनास्थळी आवश्यक ती सर्व मदत पाठवली जात आहे. मी सतत संपर्कात असून बचावकार्यावर पूर्ण लक्ष ठेवले जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT