Doda Encounter Esakal
देश

Doda Encounter: जम्मूमध्ये लष्करावर दहशतवाद्यांचा हल्ला, मोठ्या अधिकाऱ्यासह 4 जवानांचा मृत्यू

Attack On Indian Army: अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये एके-47 च्या 30 राउंड, एके-47 रायफलचे एक मॅगझिन आणि एक एचई-36 हँडग्रेनेडचा समावेश आहे.

आशुतोष मसगौंडे

सोमवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात जंगल परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ४ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी दुपारी 2.45 च्या सुमारास देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उर्बगी येथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती यानंतर चकमक सुरू झाली.

या भागात अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या असून शेवटची माहिती मिळेपर्यंत कारवाई सुरूच असल्याचे लष्कराने सांगितले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

एका पोलिस प्रवक्त्याने चकमकीची पुष्टी केली, परंतु याबाबत अधिक माहिती नसल्याचे सांगितले.

"विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, सोमवारी रात्री डोडाच्या उत्तरेकडील भागात भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मिर पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू होती. रात्री 9 च्या सुमारास दहशतवाद्यांचा पत्ता लागला आणि दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला," अशी माहिती व्हाईट नाईट्स कॉर्प्सने एका एक्स पोस्टमध्ये दिली आहे.

दरम्या या चकमकीच्या आदल्या दिवशी म्हणजेत रविवारी लष्कराने, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये एके-47 च्या 30 राउंड, एके-47 रायफलचे एक मॅगझिन आणि एक एचई-36 हँडग्रेनेडचा समावेश आहे.

अवघ्या 24 तासांपूर्वी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत ठार झालेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच सतर्क पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी त्यांचे नापाक हेतू उधळून लावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

Ashok Kharat भोंदुगिरीतून जमवली ५०० कोटींची मालमत्ता, नाशिकमध्ये ७० एकर जमीन; नातलगांच्या नावावरही संपत्ती

अफगाणिस्तानच्या जखमेवर भारताची फुंकर, पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पाठवली मदत

Sangli Politics Clash : 'पळवापळवीचे परिणाम जयंत पाटील, विशाल पाटलांना भोगावे लागतील'; चंद्रकांतदादांचा थेट इशारा, सांगलीतलं राजकारण तापणार!

MSRTC News: तोट्यातील एसटीला दिलासा; डिझेल खरेदीतून २४१ कोटींची बचत

SCROLL FOR NEXT