देश

Bharat Jodo : राहुल गांधींनाच नकोय वरुण गांधी? म्हणाले, मी त्यांना प्रेमाने...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भाजपमध्ये असलेले वरुण गांधी मागील काही दिवसांपासून सातत्याने भाजपविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे ते राहुल गांधी यांच्यासोबत जातील, अशी चर्चा आहे. याबाबत काँग्रेसनेते राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबमधील होशियारपूर येथे पत्रकार परिषदेत वरुण गांधी यांच्या यात्रेतील सहभागाच्या प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मोठं विधान केलं. ( rahul gandhi-varun gandhi news in Marathi)

राहुल गांधी यांना एका पत्रकाराने विचारले की वरुण गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी होतील का? त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "वरुण गांधी भाजपमध्ये आहेत, जर ते येथे आले तर त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते." माझी विचारधारा त्यांच्या विचारधारेशी जुळत नाही. मी संघाच्या कार्यालयात जाऊ शकत नाही, त्यासाठी माझा शिरच्छेद केला तरी बेहत्तर, असंही राहूल म्हणाले.

माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरुणने दुसरी विचारधारा स्वीकारली आणि ती विचारधारा मी स्वीकारू शकत नाही. मात्र वरुण गांधींना प्रेमाने भेटू शकतो, त्यांना मिठी मारू शकतो, पण आमची विचारधारा वेगळी आहे. माझ्या कुटुंबाची विचारधारा वेगळी आहे आणि आरएसएसची विचारधारा वेगळी आहे. वरुण गांधी यांचा त्या विचारधारेवर विश्वास आहे, असंही राहुल म्हणाले.

वरुण गांधी आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. नुकतेच राहुल गांधी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या वक्तव्यानंतर वरुण गांधी यांनीही असेच वक्तव्य केले. ज्यामध्ये वरुण गांधी म्हणाले होते की, देशातील काही लोकांना फक्त हिंदू-मुस्लिम करायचे आहे. विशेष म्हणजे वरुण गांधी यांनी आपण ना नेहरूंच्या विरोधात आहोत, ना काँग्रेसच्या असही म्हटलं होतं.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, २० वर्षांनी निकाल

Amit Shah Kolhapur Speech : अमित शहांकडून कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट ‘शिवसेना प्रमुख’ म्हणून उल्लेख

पवनराजे निंबाळकर हत्याकांड! तपासातील त्रुटींवर कोर्टाचा कठोर आक्षेप; निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे पॉइंट टू पॉइंट

महाराष्ट्र जळतोय, राजकारणी फक्त फोडाफोडीत व्यस्त; ऑपरेशन टायगरवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, अमित शाहांच्या PM मिशनवर मोठा दावा

IND vs AFG 3rd ODI: हर्षित राणा बाकावर, KL Rahul ला विश्रांती अन्... भारतीय संघात ३ बदल; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT