dogs found chewing on corona virus patients corpse in hospital area at andhra pradesh
dogs found chewing on corona virus patients corpse in hospital area at andhra pradesh 
देश

कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके...

वृत्तसंस्था

विशाखापटणम (आंध्र प्रदेश): कोरोना बाधित रुग्णाच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना शासकीय रुग्णालयाच्या परिसरात घडल्यामुळे खळबळ उडाली. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) रुग्णालयाच्या परिसरात ही घटना घडली आहे.

रुग्णाला रुग्णालयात दाखल का केले नव्हते. रुग्णालय परिसरात असलेल्या बेघरांसाठी असलेल्या शेडमध्ये ते का राहत होते? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. शिवाय, रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. रुग्णालयाच्या परिसरात भटकी कुत्री एका व्यक्तीचे लचके तोडत असल्याचे सुरक्षारक्षकाने पाहिले. कुत्र्यांना हाकलल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. कुत्र्यांनी शरिराच्या काही भागाचे लचके तोडले होते.

रिम्सचे अधीक्षक डॉ. श्रीरामुलू म्हणाले की, 'रुग्णालयाच्या नोंदीनुसार संबंधित व्यक्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली नव्हती. रुग्ण किंवा बाह्यरुग्ण म्हणून त्यांची कोणतीही नोंद नाही. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 ऑगस्टला रूग्णवाहिकेने त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलेच नाही. रुग्णालयात त्यांची कोणतीही नोंद नाही. ते बेघरांसाठी असलेल्या शेडमध्येच राहत होते. तसेच त्यांना रुग्णालयात कोणीही भेटायला आल्याची नोंद नाही. रुग्णालयाने त्यांना प्रवेश नाकारला का किंवा त्यांना कोणत्याही उपचाराशिवाय पाच दिवस बेघरांसाठी असलेल्या शेडमध्ये का झोपायला लागले, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.'

दरम्यान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते चंद्रबाबू नायडू यांनी मृतदेहाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही घटना म्हणजे मानवाधिकाराच्या उल्लंघनाची गंभीर घटना आहे. एखाद्या कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडण्यासारखी गंभीर घटना घडणे, हे राज्य सरकारचे अपयश आहे, असेही नायडू यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT