Donald Trump Announces 25 Percent Tariff on Indian Imports: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ कर लावला आहे. याआधीही भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला गेला होता. त्यामुळे आता अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावला असल्याचे स्पष्ट झालं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सातत्याने, धक्कादायक विधानं करत आहेत. शिवाय भारताला लक्ष्य करत होते. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत आहे आणि नंतर त्या तेलाचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या किमतीत विकून मोठा नफा कमवत आहे. असा आरोप ट्रम्प यांनी केलेला आहे. शिवाय, आपण भारतावरली टॅरिफ वाढणार असल्याची धमकीही त्यांनी आधीच दिली होती.
यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. हे आरोप अन्याय्य आणि निराधार असल्याचे म्हटले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी करून म्हटले होते की, भारताला लक्ष्य करणे केवळ चुकीचेच नाही तर या देशांच्या बोलण्यात आणि कृतीतील फरक देखील उघड करते.
तसेच, भारताला रशियाकडून तेल आयात करण्यास भाग पाडले गेले, कारण युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर पारंपारिक पुरवठादारांनी त्यांचा पुरवठा युरोपकडे वळवला होता. त्यावेळी, अमेरिकेनेच भारताला अशी पावले उचलण्यास प्रोत्साहित केले होते जेणेकरून जागतिक ऊर्जा बाजार स्थिर राहू शकेल. असंही भारताकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर रशियानेही प्रतिक्रिया दिली आहे. “स्वतंत्र देशांना आपल्या व्यापार भागीदारांची निवड करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ट्रम्प यांची भूमिका बेकायदेशीर असून दुसऱ्या देशांवर दबाव आणण्याचा हक्क कोणालाही नाही, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.