US President Donald Trump extends birthday wishes to Indian Prime Minister Narendra Modi through a personal phone call.
Donald Trump wishes Narendra Modi birthday : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सायंकाळी उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या फोनवरील संभाषणात दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका संबंध आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याची इच्छा अध्यक्ष ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांनी फोन करून दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहे. तसेच मोदींनी ट्रम्प यांना उद्देशून आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, " माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तुमचा फोन कॉल आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटीबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी तुमच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देतो.
या वर्षी पंतप्रधान मोदी बुधवारी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशात असतील. पंतप्रधान मोदी येथील धार जिल्ह्यातील भैनसोला गावाला भेट देतील आणि महिला आणि कुटुंबांसाठी आरोग्य आणि पोषण यावर आधारित मोहीम सुरू करतील.
याशिवाय ते कापड उद्योगासाठी पंतप्रधान मित्र पार्कची पायाभरणी देखील करतील. या पार्कचे उद्दिष्ट देशाला कापडाचे केंद्र बनवणे आणि निर्यात आणि रोजगाराला प्रोत्साहन देणे आहे. सरकार देशभरात असे सात पंतप्रधान मित्र पार्क उभारणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.