नवी दिल्ली - कोरोना लॉकडाउनच्या काळात राष्ट्रीय पुस्तक न्यास म्हणजेच ‘एनबीटी’ने राबविलेल्या ‘ग्रंथांच्या संगतीत घरातच थांबा’ या मोहिमेला भरभरून प्रतिसाद मिळाला असून सर्व भारतीय भाषांमधील शंभराहून जास्त पुस्तके डाऊनलोड करून घेऊन ऑनलाइन वाचणाऱ्यांची संख्या ४६ हजारांवर पोहोचली आहे. यात सुमारे एक हजार मराठी वाचकांचाही समावेश आहे.
‘एनबीटी’च्या वतीने लॉकडाउन १ सुरू झाल्यावर लगेच म्हणजे २७ मार्चपासून ऑनलाइन पुस्तके देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. इंग्रजी, हिंदी , बंगाली आणि मराठीसह सर्व भाषांमधील गाजलेल्या पुस्तकांचा यात समावेश आहे. मुख्यत- मुले आणि युवक हा वयोगट लक्षात घेऊन महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, प्रेमचंद आदींची गाजलेली पुस्तके विनामूल्य डाउनलोड सुविधेसह उपलब्ध करून दिली आहेत. ‘एनबीटी’च्या वतीने आगामी काळात कोरोना महामारीच्या संदर्भातील पुस्तके, अभ्यास अहवाल लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे संस्थेच्या सहायक संचालिका कांचन शर्मा यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनच्या काळात नागरिकांची मानसिकता जपण्याच्या दृष्टीने, जेष्ठ नागरिक, मुले, पालक, महिला, युवा पिढी अशा सात वयोगटांसाठी हे साहित्य उपलब्ध असेल. लॉकडाउनमधील प्रत्येक दिवशी इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, आदी माध्यमातून मुलांसाठी रोज काही ना काही नवा मजकूर टाकण्याचा पायंडा सुरू केला. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ‘एनबीटी’ने या काळात किमान शंभर पुस्तके पीडीएफ फॉरमॅटमध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून दिली. आतापर्यंत ही पुस्तके देशभरातील ४६, २०० पेक्षा जास्त साहित्यप्रेमींनी डाऊनलोड करून घेतली आहेत, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. जागतिक पुस्तक दिनानिमित्त २३ एप्रिलला ‘एनबीटी’ने फिक्कीच्या संयुक्त सहकार्याने आयोजित केलेल्या साहित्य वेबीनार उपक्रमाला भारतातील साहित्यिकांनी हजेरी लावून आपली मते मांडली.
‘एनबीटी’तर्फे लवकरच
- मराठीसह वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील पुस्तकांमधील गाजलेल्या बालकथांचे अभिवाचन आकाशवाणीच्या माध्यमातून
- ताणतणावावर कशी मात करावी, याबाबत हेल्पलाईन
- लॉकडाउन काळात खास प्रकाशित केलेल्या साहित्याच्या आवृत्या आणि पुस्तकांचे प्रकाशन
- ‘हे आहेत आमचे कोरोना योद्धे’ या प्रेरणादायी यशोगाथा असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन
फक्त एक पुस्तक तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. फक्त गरज असते ती तुम्ही योग्य पुस्तक निवडण्याची !
- युवराज मलिक, संचालक एनबीटी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.