नवी दिल्ली : एकीकडे देशात हुंडा प्रथेला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना सध्या कॉलेजच्या एका पुस्तकात चक्क हुंडा प्रथेचे (Merits of Dowry) फायदे सांगण्यात आले आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social Media) या पानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या पुस्तकाच्या पानाचा फोटो शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनीही शेअर केला असून, याबाबत त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अशा गोष्टी हटवण्याची मागणी केली आहे. अभ्यासक्रमात अशा गोष्टी लिहिणे लाजिरवाणे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. (Merits Of Dowry Viral On Social Media)
दरम्यान, व्हायरल होणारे पुस्तकातील हे पान टीके इंद्राणी यांच्या परिचारिकांसाठीचे समाजशास्त्र पाठ्यपुस्तकातील असल्याचे मत अनेक नेटिझन्सने व्यक्त केले आहे. हे पुस्तक नर्सिंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असून याच्या मुखपृष्ठावर इंडियन नर्सिंग कौन्सिल सेलेब्स असे लिहिण्यात आले आहे. महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा अशी पुस्तके भाग आहेत हे धक्कादायक असल्याचे सांगत ट्विटर वापरकर्त्यांनी या पुस्तकावर टीका केली आहे.
व्हायरल होणाऱ्या पेजवर नेमकं काय?
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या या पुस्तकाच्या पानावर फर्निचर, रेफ्रिजरेटर आणि वाहनांसारख्या उपकरणांसह नवीन घर उभारण्यासाठी हुंडा उपयुक्त आहे, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, ज्या मुलींना हुंड्यामध्ये पालकांच्या मालमत्तेत वाटा मिळाला आहे त्यांना हुंडा प्रथेत आणखी एक योग्य असल्याचे सूचीबद्ध करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हुंडा पद्धती कुरूप दिसणाऱ्या मुलींचा विवाह होण्यास मदत करू शकते असादेखील उल्लेक करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.