Dr. APJ Abdul Kalam Jayanti esakal
देश

Dr. APJ Abdul Kalam Jayanti : मिसाईलमॅनच्या साधेपणाचे 'हे' ५ किस्से माहितीये का?

त्यांच्या जीवनातल्या कही घटना, किस्से आपल्याला खूप काही शिकवून जातात. अशा या स्वतःसह आपल्यातल्या अनेकांचं आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तीमत्वाचे काही किस्से जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Dr. APJ Abdul Kalam Interesting Stories : देशाचे ११ वे राष्ट्रपती, मिसाइल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम हे कायमच अनेकांच्या जीवनाचे प्रेरणास्थान राहिले आहेत. त्यांचा संबंध जीवनप्रवास जसा प्रेरणादायी आहे, तसेच त्यांच्या जीवनातल्या कही घटना, किस्से आपल्याला खूप काही शिकवून जातात. अशा या स्वतःसह आपल्यातल्या अनेकांचं आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तीमत्वाचे काही किस्से जाणून घेऊया.

1. साडे तीन लाखाचा चेक काढून राष्ट्रपती भवनचं भाडं दिलं

आपले ११ राष्ट्रपती म्हणून डॉ. कलाम यांची निवड झाल्यावर देशातल्या सर्वच स्तरातून याचं कौतुक झालं. जसं कलाम यांनी देशाला भरभरून दिलं तसं देशवासियांनीपण त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यांनी राष्ट्रपती झाल्यावर २००६ मध्ये आपल्या कुटुंबाला राष्ट्रपती भवनात आमंत्रीत केलं. त्यांच्या कुटुंबातले ५२ लोक दिल्लीला आले आणि ८ दिवस राहिले.

ते गेल्यावर आपल्या कुटुंबाच्या राहण्या-खाण्याचा सर्व खर्च आपल्या स्वतःच्या खिशातून दिला. एवढेच नाही तर कुटुंबीय दिल्लीनंतर अजमेर शरीर इथं गेले. या सर्वचा एकूण खर्च ३ लाख ५२ हजार रूपये झाला होता. ज्याचा त्यांनी राष्ट्रपती कार्यालयात चेक पाठवला होता.

राष्ट्रपती भवनातल्या इफ्तार पार्टीचे पैसे अनाथाश्रमाला दिला

हा किस्सा डॉ कलाम यांचे सचिव पी. एम. नायर यांनी एका मुलाखतीत सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं की, राष्ट्रपती भवनात दरवर्षी इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. पण एकदा डॉ कलाम यांनी त्यांना बोलवलं. इफ्तार पार्टीला किती खर्च येतो, का आयोजन होतं अशी सगळी माहिती घेतली; आणि या पार्टीसाठी लागणारे अडिच लाख रूपये वाया न घालवता अनाथाश्रमाला द्या असं सांगितलं.

मग त्या पैशातून २८ अनाथाश्रमातल्या मुलांना पीठ, डाळ, ब्लँकेट, स्वेटर वाटण्यात आलं. या पैशात डॉ कलाम यांनी स्वतः कडून अजून १ लाख रूपये घातले होते.

जेंव्हा मोराच्या ट्यूमरचा उपचार केला

राष्ट्रपती भवनच्या मुघल गार्डनमध्ये फिरत असताना त्यांना एक मोर दिसला. तो तोंड उघडू शकत नव्हता. हे बघून त्यांनी जनावरांच्या डॉक्टरांना बोलवून घेतलं आणि त्याची तपासणी केली. त्याला तोंडात गाठ असल्याचं समजलं. त्याच्यावर उपचार करून बऱ्याच दिवस आयसीयू मध्ये ठेवल्यावर मग त्याला मुघल गार्डनमध्ये सोडण्यात आलं.

तंजानियाच्या मुलाची मोफत हार्ट सर्जरी

डॉ कलाम २००० मध्ये तंजानिया देशात गेले होते, तिथं त्यांना समजलं की, त्याभागात असे अनेक मुलं आहेत जे हृदय रोगाने पीडित आहेत. उपचार करू न शकल्याने मृत्यू होत आहे. या दौऱ्याहून परतल्यावर त्यांनी या मुलांना आणि त्यांच्या आईला हैद्राबादला बोलवून त्यांची हार्ट सर्जरी केली. त्या मुलांच्या येण्याडजाण्याचे विमानाची तिकीटं केली, त्यांची राहण्याची सोय केली.

गार्ड केबिनमध्ये लावला हिटर

एकदा राष्ट्रपती भवनमध्ये फेरफटका मारत असताना त्यांनी बघितलं की, सुरक्षा गार्डच्या केबिनमध्ये सुरक्षा रक्षक थंडीने कुडकूडत आहे. हे बघून त्यांनी ताबडतोब त्या केबिनमध्ये हीटर लावून घेतला. तर उन्हाळ्यात उकाड्यावर उपाय म्हणून फॅनसुध्दा लावून घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT