Dr chintan Vaishnava Appointment as The new mission director of Atal Innovation Mission 
देश

अटल इनोव्हेशन मिशन'चे नवे मिशन संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांची नियुक्ती

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : नीती आयोगाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'अटल इनोव्हेशन मिशन'चे (एआयएम) नवे मिशन संचालक म्हणून प्रख्यात सामाजिक-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. चिंतन वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाअंतर्गत 'अटल इनोव्हेशन मिशन' या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. पहिले मिशन  संचालक म्हणून 2017 पासून काम पाहणाऱ्या रामनाथन रामानन यांच्याकडून डॉ. वैष्णव सूत्रे स्वीकारणार आहेत. या महिन्याच्या मध्यपर्यंत ते कार्यभार घेतील. डॉ. वैष्णव अभियंता असून,  ते मानवी आणि तंत्र विषयक जटील प्रणाली उभारणे यातील तज्ज्ञ आहेत.

शिक्षक, नवसंशोधक, उद्योजक असणाऱ्या वैष्णव यांना भारत आणि अमेरिकेतही नवसंशोधन संस्थांमध्ये काम करण्याचा  अनुभव आहे. गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ त्यांनी 'एमआयटी'मध्ये अध्यापन आणि संशोधन अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मानवी जीवन सुधारताना येणारे  मूलभूत अडथळे दूर करण्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी भारतातील ग्रामीण लोकांसमवेत राहून काम केले आहे. अनेक व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांचे ते सहसंस्थापक आहेत. अमेरिकेतील एमआयटीमधून त्यांनी तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि धोरण या विषयात पीएचडी मिळविली आहे.  

भारतीय इंजिनीअरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, एकतर्फी प्रेमातून झाला गोळीबार​

खळबळजनक ! राफेल करारात भ्रष्टाचार, फ्रान्सच्या वेबसाइटचा दावा

देशभरात नवसंशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी अनुकूल व्यवस्था (इकोसिस्टिम) निर्माण करून प्रोत्साहन देणे, तसेच नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक तयार करणे हे अटल इनोव्हेशन मिशनचे उद्दिष्ट आहे. अटल इनोव्हेशन मिशनने आतापर्यंत 650 जिल्ह्यातल्या शाळांमध्ये  सात हजार 259 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारल्या आहेत. यातून 35 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत नवतंत्रज्ञान पोचविले आहे. या अभियानाद्वारे 68 'अटल इन्क्युबेटर' कार्यान्वित केले असून, दोन हजाक स्टार्टअप सुरू करण्यास चालना दिली आहे. त्यापैकी 625 स्टार्टअप हे महिलांचे आहेत. ग्रामीण भारतातल्या गरजांची दखल घेणाऱ्या समाजाभिमुख नवसंशोधनाला चालना देण्यासाठी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर उभारणी या अभियानातून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT