Farooq Abdullah on Kashmiri Pandit Murder
Farooq Abdullah on Kashmiri Pandit Murder Team eSakal
देश

काश्मिरी पंडितांप्रति सहानुभूती दाखवण्यापासून रोखलं : फारूख अब्दुल्ला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडीत राहुल भट (Kashmiri Pandit Murder) यांची हत्या केली. त्यानंतर काश्मीरमधील वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. तसेच काश्मीर फाईल्स (Kashmir Files Movie) या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील केली.

बडगाममध्ये काश्मिरी पंडितची हत्या करण्यात आली. त्यावेळी सहानुभूती म्हणून आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला निघालो होतो. पण, आम्हाला तिथे जाण्यापासून रोखण्यात आले. सहानुभूती दाखविण्यासाठी देखील आमच्यावर बंदी घातली जाते. मग, हिंदू-मुस्लीम जवळ कसे येणार? दोन्ही धर्मीयांनी एकत्र यावे असं वाटत असेल तर द्वेष पसरवणे कमी करायला पाहिजे, असं फारूख अब्दुल्ला म्हणाले.

काश्मीर फाइल्स या चित्रपटावर देखील त्यांनी टीका केली. काश्मीर फाइल्स या चित्रपटातून दोन धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. एक मुस्लीम हिंदूंना मारून त्याचं रक्त जेवणात घालून खाईल, हे खरं आहे का? मुस्लीम असं करू शकतात का? या अशा चित्रपटांमुळे मुस्लीमांवरील अत्याचार वाढले आहेत. या चित्रपटाने देशात द्वेष निर्माण केला आहे. मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. त्यामुळे आमच्या नवीन पिढीमध्ये देखील तेढ निर्माण होत आहे. अशा चित्रपटांवर बंदी आणायला पाहिजे, अशी मागणी देखील अब्दुल्ला यांनी मनोज सिन्हा यांच्याकडे केली.

काश्मिरी पंडीत राहुल भट यांच्या हत्येनंतर काश्मीरमधील वातावरण तापलं आहे. सरकारी नोकरी असलेल्या काश्मिरी पंडितांनी राजीनामा दिला असून आम्हाला काश्मीरमधून बाहेर काढा, असं पत्र राज्यपालांना लिहिलं आहे. तसेच या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी निदर्शने सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक... सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारांचा टप्पा पार, निफ्टी 23400 च्या वर

Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहुर्त ठरला? महायुतीत कोणात्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार?

Viral VIDEO: मक्कामधील पवित्र 'काबा'समोर बुरखा घातलेल्या महिलेचा डान्स; मुस्लिम जगतात संतापाची लाट

France Election: फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांच्याकडून तडकाफडकी संसद विसर्जित; निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर

Latest Marathi News Live Update : फुरसुंगीमध्ये सकाळपासून वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT