drdo. 
देश

शत्रूंच्या उडणार चिंध्या; 1 मिनिटात 700 राऊंड फायर करणार DRDOची सब-मशीनगन

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- DRDO ने  5.56x30 एमएम सब-मशीनगन विकसीत केली आहे. ही सब-मशीनगन संरक्षण मंत्रालयाच्या प्रायोगिक परीक्षणात पास झाली आहे. त्यामुळे तिच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी याची माहिती दिली. 

5.56x30 एमएम ही सब-मशीनगन जॉइन्ट प्रोटेक्टिव्ह व्हेन्चर कार्बाइन गॅस संचलित सेमी अॅटोमॅटिक शस्त्र आहे. DRDO ने याला तयार केलं आहे. विशेष म्हणजे या सब-मशीनगनमधून एका मिनीटाला तब्बल 700 राऊंड फायर करता येतात. त्यामुळे शत्रूच्या चिंध्या उडवण्यासाठी ही मशीनगण प्रभावी आहे. 5.56x30 एमएम सब-मशीनगनने अंतिम प्रायोगिक परीक्षणात आवश्यक ती सर्व मानकं पूर्ण केली आहे. 

बिअर कंपन्यांकडून मद्यप्रेमींची लूट; हातमिळवणी करून किमतीची फिक्सिंग

5.56x30 एमएम सब-मशीनगनची कार्बाईनची प्रभावी रेंज 100 मीटर पेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. एका हाताचा वापर करुनही यातून राऊंड फायर केले जाऊ शकतात. या मशीनगनचे वजन 3 किलोग्रॅम आहे. ही सब-मशीनगन गृह मंत्रालयाच्या परीक्षणात या आधीच पास झाली होती. त्यामुळे याचा वापर केंद्रीय सुरक्षा दलात आधीपासूनच करण्यात येत आहे. 

संरक्षण मंत्रालयाने निवेदन काढून या मशीनगनच्या परिक्षणाबाबत सांगितले आहे. सोमवारी या सब-मशीनगनचे अंतिम परीक्षण करण्यात आले. कडक उष्णतेच्या वातावरणात आणि उंच पर्वतावरील कडाक्याच्या थंडीतही 5.56x30 एमएम सब-मशीनगनचा वापर केला जाऊ शकतो. या मशीनगनने अंतिम प्रायोगिक परीक्षणात आवश्यक ती सर्व मानकं पूर्ण केली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT