carbine gun 
देश

कार्बाइन गनने भरणार शत्रूच्या हृदयात धडकी; DRDO ने सैन्यासाठी बनवली खास गन

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : Defence Research and Development Organisation (DRDO) ने एका अशा गनची ट्रायल पूर्ण केली आहे जी गन शत्रूला सळो की पळो करुन सोडण्याची क्षमता ठेवते. या गनमुळे शत्रूच्या हृदयात धडकी भरणार यात शंका नाही. या गनचे नाव कार्बाइन गन (Carbine Gun) असे आहे. या गनची खासियत अशी आहे की, ही गन एका मिनिटात जवळपास 700 गोळ्या अगदी सहजपणे झाडू शकते. सैन्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कार्बाइन गनमुळे भारतीय सैन्याला मोठी मदत होऊ शकेल, असं म्हटलं जातंय. 

मीडियामधील आलेल्या रिपोर्ट्सनुसार या गनची सैन्याद्वारे शेवटच्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली गेली आहे. तसेच ही वापरात आणण्यासाठी संपूर्णत: तयार असल्याचीही माहिती मिळाली आहे. असं म्हटलं जातंय की, जॉइंट व्हेंचर प्रोटेक्टीव्ह कार्बाइन ही कमी रेंजच्या ऑपरेशन्ससाठी एक खास हत्यार ठरु शकते. या गनचे खास वैशिष्ट्य आहे की, सलग फायरिंगच्या दरम्यान सैनिक या गनला अगदी सुलभतेने हाताळू शकतात. 

ही गन वजनाने देखील एकदम हलकी आहे. इतकी सैनिक केवळ एका हाताने सहजपणे फायरिंग करु शकतो. असं म्हटलं जातंय की, ही गन सैन्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या 9 एमएम कार्बाइन गनची जागा घेईल. DRDO च्या म्हणण्यानुसार, पुणे मधील आर्मामेंट रिसर्च एँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने या गनचे डिझाईन केले होते. भारतीय सैन्याव्यतिरिक्त CRPF, BSF सहित इतर सैन्यदले देखील याचा वापर करु शकणार आहेत. या कार्बाइन गनच्या गोळ्या पुणेमधील एम्यूशन फॅक्टरीमध्ये तयार होणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT