Gangster Anil Dujana killed 
देश

Gangster Anil Dujana killed : यूपीत आणखी एक एन्काऊंटर! तुरुंगातून जामिनावर सुटलेला कुख्यात गँगस्टर ठार

रोहित कणसे

Anil Dujana latest News : यूपी एसटीएफसोबत झालेल्या इन्काउंटरमध्ये गँगस्टर अनिल दुजाना याला ठार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यूपी सरकारच्या कार्यालयातून यूपीच्या टॉप 65 माफियांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ग्रेटर नोएडातील अनिल दुजाना यांचेही नाव होते. कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना दिल्लीच्या तिहार तुरुंगात बराच काळ बंद होता, मात्र काही काळापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिली होती धमकी

तुरुंगातून बाहेर येताच अनिल दुजाना याने संगीता, त्याची पत्नी आणि जयचंद प्रधान हत्या प्रकरणातील साक्षीदार यांना धमकावले होते. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करत गेल्या आठवड्यात अनिल दुजाना याच्यावर2 गुन्हे दाखल केले.

नोएडा पोलिसांची स्पेशल सेल टीम आणि एसटीएफची टीम दुजानाला पकडण्यासाठी मोहिम सुरू केली होती. गेल्या काही दिवसांपासून 7 टीम सातत्याने 20 हून अधिक ठिकाणी छापेमारी करत असल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यूपीसह अनेक राज्यांत गुन्हे दाखल

अनिल दुजाना यांच्यावर यूपीसह इतर राज्यांमध्ये सुमारे 50 खून, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल आहेत. बदलपूरचे दुजाना गाव एकेकाळी कुप्रसिद्ध सुंदर नागर उर्फ ​​सुंदर डाकूच्या नावाने ओळखले जात होते.

सत्तर आणि ऐंशीच्या दशकात दिल्ली-एनसीआरमध्ये सुंदरची भीती होती. त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अनिल नागर उर्फ ​​अनिल दुजाना हा याच दुजाना गावचा आहे. पोलिस रेकॉर्डमध्ये त्याच्याविरोधात 2002 मध्ये, हरबीर पहेलवानच्या हत्येचा पहिला गुन्हा गाझियाबादमधील कवी नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.

यूपीमध्ये गुन्हेहारांचे इन्काउंटर सुरूच

आता यूपीतील एन्काऊंटरमध्ये गँगस्टर अनिल दुजानाचेही नाव जोडले गेले आहे. एप्रिलमध्ये उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी असद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही इन्काउंटरमध्ये मारले गेले. यानंतर यूपीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT